belgaum

मुतगा ता. जि. बेळगांव येथील प्रतिष्ठित नागरिक,मार्केट व मार्केट यार्ड येथील कांदा बटाटा व्यापारी परशराम धनाजी चौगुले (६३ वर्ष) यांचे दि २७ जानेवारी २९२३ रोजी सकाळी ०७१५ च्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यानिमित्ताने

मुतगा येथील शेतकरी कुटुंबात १५ जुलै १९५९ रोजी परशराम यांचा जन्म झाला.बरीचवर्षे एकत्रितपणे नांदणाऱ्या चौगुले कुटुंबीयांचा शेती हाच मुख्य व्यवसाय होता.कालांतराने धनाजी आणि मल्लाप्पा या भावंडांनी मार्केटमध्ये कांदा बटाटा विक्रीचा व्यवसाय सुरू केला.

हाच व्यवसाय पुढे मोठ्या प्रमाणात परशराम आणि भाऊ यांनी जोमाने वाढविला.प्राथमिक शिक्षण सरकारी मराठी शाळा व माध्यमिक शिक्षण न्यु इंग्लिश स्कुल मध्ये घेतल्यानंतर भाऊराव काकतकर कॉलेजमधून कॉमर्स या विषयातून पदवीधर झाले.त्यानंतर वडिलांच्या व्यवसायात झोकून देऊन काम सुरु केले.

वडील आणि काकाच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी हा व्यवसाय एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला
त्यांचा व्यवसाय डी आर सी या नावाने ओळखला जातो. या फर्मला मार्केट व मार्केटयार्ड बेळगांव परिसात एक वेगळा नांवलौकीक आहे.आपल्या बोलक्या व लाघवी स्वभावाने परशराम यांनी सर्वांच्या मनात एक वेगळेच व अढळ स्थान निर्माण केले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या एकाही व्यक्तीला कसल्याही कारणास्तव त्यांनी दुखावलं नाही तर भरभरून प्रेम दिलं.

याठिकाणी महत्वाची गोष्ट नमूद कराविशी वाटते ती चौगुले आणि डोणी या हिंदू वमुस्लीम कुटुंबियाच्या सलोख्याची…
गेली जवळ जवळपास पाच दशके झाली दोन्ही कुटुंब व्यावसायाच्या निमित्ताने एकत्र आली व कधी एकरूप होऊन गेली हे कळलेच नाही”
एकमेकांच्या कठीण प्रसंगात दोन्ही कुटुंबीयांनी जाती-धर्माच्या भिंती गाडून सहाय्य केले,भरपूर प्रेम दिलं आधार दिला व समाजात एक वेगळाच आदर्श निर्माण केला.याला कारणीभूत होतं ते परशराम यांच इक्बाल डोनी(सावकार)यांच्या कुटुंबियांच्या प्रति असणारं प्रेम आणि जिव्हाळा तान पिढ्यांपासून सुरू असणारं हे नातं अधिक दृढ होण्यास परशराम हेच कारणीभूत होते.
मार्कशीट व्यापारी व गिऱ्हाईकांसोबतचे नाते अत्यंत सलोख्याचे व आपुलकीचे होते मार्केटयार्ड व्यापारी असो किंवा शेतीमाल घेऊन येणारे शेतकरी असो प्रत्येकाला हवाहवासा वाटणारे परशराम आम्हास परके करून गेल्याची भावना व्यक्त करत आहेत.Parasharam chougule

परशराम चौगुले यांच्या स्वभावाचा एक महत्वाचा गुण म्हणजे त्यांचे दातृत्व. उभ्या आयुष्यात परशराम यांनी अनेक नातेवाईकांना, मित्रपरीवाराला त्यांच्या कठीण प्रसंगात सढळ हस्ते मदत केली पण स्वतःच्या कुटुंबियांनासुद्धा कल्पना दिली नाही. एका हाताने दिलेलं स्वतःच्या दुस-या हाताला कळू दिलं नाही किवा त्याचा कुठेही गाजावाजा केला नाही. मुतगा परिसरातील अनेक मंदिरांना, शाळांना , अनेक संघ संस्थांना सामाजिक कार्याला सढळहस्ते मदत केली.

आपल्या कौटुंबिक जीवनात परशराम अत्यंत सुखी होते. त्यांचे व त्यांच्या लहान भाऊ सुरेश यांचे नाते म्हणजे जणू राम-लक्ष्मणासारख. अडत व्यापारी असलेल्या सुरेश यांना त्यांनी व्यवसायात कायम मार्गदर्शन केलं.दोन्ही भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय रोज सकाळी शेतीची कामे करून आपापले व्यवसाय सांभाळत. आपल्या व भावाच्या मुलाना उच्च विद्याविभूषीत करून स्थिरस्थावर करण्याच कार्य सुरू असतानाच काळाने त्यांच्यावर अचानक अकल्पीत असा कधी सहन न होणारा घाला घातला. मोठ्या मुलगा सुमित याला आपल्या व्यवसायात घेतले तर लहान मुलगा महेश हा इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून पुणे येथील इन्फोसिस या कंपनीत कार्यरत आहे. मोठी मुलगी पुजा ही विवाहीत आहे. पत्नी सुजाता, भाऊ सुरेश, भावजय, पुतण्या पुतणे यांना व इतर कुटुंबियांना, पै पाहुणे व शेकडो मित्रमंडळीला परशरामचे अचानक जाणे सर्वांच्या मनाला चटका लावून गेले.अवघा मुतगा परिसर, मार्केट यार्ड व कांदा मार्केट मधील मंडळी त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक करीत आहे.

मरावे परी कीर्तीरूपे उरावे या उक्तीप्रमाणे जगलेल्या परशराम यांच्या आत्म्यास परमेश्वर चरणी सद्गती लाभो हीच प्रार्थना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.