Friday, April 19, 2024

/

टिपू सुलतान संघर्ष समितीच्या सचिवांनी व्यक्त केली शिवरायांच्या मूर्तीबाबत प्रतिक्रिया

 belgaum

बेळगाव लाईव्ह : येळ्ळूर येथील राजहंसगडावर प्रतिष्ठापित करण्यात आलेली शिवरायांची सिंहासनारूढ मूर्ती राजकारणाचा विषय बनली आहे. यासंदर्भात आजपर्यंत अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून आज टिपू सुलतान संघर्ष समितीचे राज्य सचिव फजल पठाण यांनीही शिवरायांच्या मूर्तीबाबत आपले मत मांडले आहे.

राजहंसगडावर प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या शिवरायांच्या मूर्ती बाबत अनेकांनी चुकीचे समज पसरवून जाणीवपूर्वक हा विषय ताणायचा प्रयत्न केला जात आहे. मात्र मराठी जनतेचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांनी समाजाला आजवर अनेक आदर्शपूर्ण असे विचार दिले आहेत.

अन्याय, अत्याचाराविरोधात तलवार उचलणाऱ्या शिवरायांच्या विचारांविरोधात आज केवळ राजकारणाचा विषय म्हणून भूमिका मांडण्यात येत आहे. जाती-धर्माच्या नावावरून समाजात तेढ निर्माण करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न होत आहे. शिवरायांच्या स्वराज्यात अनेक मुस्लिम मावळ्यांनी योगदान दिले आहे.

 belgaum

शिवरायांची मूर्ती प्रतिष्ठापन केल्यामुळे प्रत्येकाला त्यांच्या विचारांची, तत्वांची जाणीव होईल, प्रेरणा मिळेल. हे कार्य चांगले असून मूर्ती प्रतिष्ठापना आणि लोकार्पण सोहळ्यात कोणतेही विघ्न येता काम नये. या प्रकरणी जातीयवादाला प्रोत्साहन न देता मूर्तीचे अनावरण व्हावे, सर्वधर्मसमभाव जपून सर्वांनी मार्गक्रमण करावे, अशा प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या.Fazal pathan

बेळगावमध्ये अलीकडे विविध संघ, संघटनांचे पदाधिकारी चुकीचा संदेश पसरवून समाजातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहेत. बेळगावमध्ये सर्व जाती-धर्माचे-समाजाचे लोक एकोप्याने आणि सौहार्दाने नांदतात.

मात्र जाणीवपूर्वक वैयक्तिक स्वार्थ आणि राजकारणासाठी बेळगावमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा लोकांवर कायदेशीर कारवाईसाठी पोलीस विभागाकडे आपण दाद मागणार असल्याचे फजल पठाण यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.