belgaum

खरा केला ‘हाय कमांड’ला दिलेला शब्द;

0
Satish jarkiholi
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बागलकोट विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले असून उमेदवार उमेश मेटी यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आहे. या विजयामागे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा बेळगाव जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांचे नियोजनबद्ध प्रयत्न आणि प्रभावी प्रचार महत्त्वाचा ठरल्याचे मानले जात आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून जारकीहोळी यांनी बागलकोटमध्ये तळ ठोकून संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांचे संघटन आणि मतदारांशी थेट संवाद यावर भर दिला होता. निवडणुकीपूर्वीच “काँग्रेस निश्चितपणे विजयी होईल” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. अखेर निकालात त्यांचा हा दावा खरा ठरला आहे.

या पोटनिवडणुकीत उमेश मेटी यांनी 97,941 मते मिळवत आपल्या निकटच्या प्रतिस्पर्ध्यावर तब्बल 21,866 मतांनी विजय मिळवला. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच त्यांनी आघाडी घेतली आणि अखेरपर्यंत ती कायम ठेवत निर्विवाद विजय संपादन केला.

 belgaum

ही जागा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एच. वाय. मेटी यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती. त्यांच्या पश्चात उमेश मेटी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मतदारांनीही मोठ्या प्रमाणावर काँग्रेसला पाठिंबा दर्शवित हा विजय मिळवून दिला.

दरम्यान, या विजयामुळे बागलकोटसह बेळगाव परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.