Tuesday, April 16, 2024

/

कणबर्गी सिद्धेश्वर देवस्थान भाविकांसाठी मूलभूत गरजांची पूर्तता : आम. अनिल बेनके

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील कणबर्गी येथे असलेल्या श्री सिद्धेश्वर देवस्थानाला उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांनी भेट दिली. या परिसरात कणबर्गी गावापासून श्री सिद्धेश्वर मंदिरापर्यंत पाण्याची लाईन टाकण्याचे आश्वासन आमदारांनी दिले होते.

दिलेले आश्वासन पूर्ण करत आम. अनिल बेनके यांनी भविष्यातही कणबर्गी सिद्धेश्वर देवस्थान भाविकांसाठी मूलभूत गरजांची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

यावेळी बोलताना आम. अनिल बेनके म्हणाले, यात्रा काळात भाविकांना कोणत्याही प्रकारची असुविधा निर्माण होऊ नये, यासाठी दिलेल्या आश्वासनानुसार सर्व कामकाज पूर्ण करण्यात आले आहे. या गावात एलईडी बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून १०० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.

 belgaum

दिलेल्या आश्वासनानुसार सर्व कामकाज पूर्ण करण्यात आले असून उर्वरित काही कामे करावयाची असल्यास येत्या दोन दिवसात सिद्धेश्वर भाविकांनी आपल्याला याबद्दल कल्पना द्यावी, त्यानुसार सर्व कामकाज पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.Sidheshwar temple

येथील स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार देवस्थान ट्रस्ट कमिटी आणि देवस्थानच्या प्रवेशद्वारावर काँक्रीट रस्त्याची उभारणी, पथदिप बसविणे, भाविकांच्या वापरासाठी स्वच्छतागृहे, स्नानगृहे बांधणे आणि इतर मूलभूत गरजा पूर्ण करण्यात आल्या आहेत. आमदार अनिल बेनके यांच्या प्रयत्नातून हे कामकाज पूर्ण करण्यात आल्याबद्दल स्थानिक रहिवासी आणि सिद्धेश्वर पंच कमिटीने आमदारांचे आभार मानले.

यावेळी आमदारांसमवेत श्री सिद्धेश्वर व्यवस्थापक मंडळ, श्री सिद्धेश्वर भक्त मंडळ, संजय सुंठाकर, सिद्राय सांबरेकर, भावकाण्णा हिरोजी, अप्पय्या बिर्जे, मारुती पुजारी, सुबराव करडी, टोपण्णा अंतरगली व रहिवासी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.