Wednesday, April 24, 2024

/

शाळा प्रवेशासाठी लागणारी प्रमाणपत्रे मिळणार जलदगतीने

 belgaum

बेळगाव लाईव्ह : महसूल खात्याने सुरु केलेली ओटीपी सेवा आणि इतर व्यवस्थेमुळे वेळेत प्रमाणपत्रे उपलब्ध करुन दिली जात असल्याने नव्या शैक्षणिक वर्षातील शाळा प्रवेश घेणाऱ्या पालकांची धडपड कमी होणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षातील शाळा प्रवेशामुळे तहसील कार्यालयाकडे जात आणि उत्पन्न प्रमाणपत्रांची मागणी वाढली आहे. परिणामी त्यासाठी पालकांची धडपडही सुरु झाली आहे.

नव्या शैक्षणिक वर्षात सध्या केवळ पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक उत्पन्न प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडे अर्ज करत आहेत. शैक्षणिक वर्ष जरी जूनमध्ये सुरु होणार असले तरी खासगी शाळांकडून आतापासूनच प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

शाळा प्रवेशासाठी शुल्कात सूट मिळावी म्हणून पालकांकडून जात आणि उत्पन्न प्रमाणपत्र प्रवेश अर्जासोबत सोडून दिले जात आहे. त्यामुळे, ही दोन्ही प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पालक तहसील कार्यालयात जात आहेत.

 belgaum

अर्जदाराला जात आणि उत्पन्न प्रमाणपत्र देण्यासाठी नव्या सॉफ्टवेअरचा वापर दोन वर्षापूर्वी सुरु झाला असून कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती, त्यांचे वार्षिक उत्पन्न, मोबाईल क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक आदी माहिती सॉफ्टवेअरवर अपलोड करण्यात आली आहे. अर्ज करताच या माहितीच्या आधारे प्रमाणपत्र मंजूर करुन दिले जाते. त्यामुळे, अर्ज छाननीसाठी लागणारा वेळही कमी झाला आहे.यामुळे पालकातून समाधान व्यक्त होत आहे.

अनुसूचित जाती आणि जमातीसाठी दिल्या जाणाऱ्या जात प्रमाणपत्राचा कालावधी आजीवन आहे. तर इतर मागासांना दिल्या जाणाऱ्या जात आणि उत्पन्नाच्या प्रमाणपत्राचा कालावधी पाच वर्षाचा आहे. महसूल खात्याने यापूर्वी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना जात आणि उत्पन्न प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिले होते.

त्याचा कालावधी पाच वर्षाचा असल्यामुळे सध्या बहुतेक विद्यार्थ्यांकडे ही प्रमाणपत्रे आहेत. दोन वर्षापूर्वी जात आणि उत्पन्न प्रमाणपत्र मागणीसाठी शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला रोज ३०० ते ४०० अर्ज दाखल होत होते. पण, आता ही संख्या तालुक्यात ७० ते ८० अर्जावर येऊन ठेपली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.