Thursday, April 25, 2024

/

एसएसएलसी परीक्षा : सुधारित अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक परीक्षा आणि मूल्यमापन निर्णय मंडळाने दहावी परीक्षेचे सुधारित अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.

परीक्षेच्या वेळापत्रकात किरकोळ बदल करण्यात आला असून ४ एप्रिल रोजी होणार गणित विषयाचा पेपर ३ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. शिक्षण खात्याने ५ डिसेंबर रोजी दहावी परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले होते.

मात्र आता या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले असून सुधारित वेळापत्रकानुसार ३१ मार्च रोजी प्रथम भाषा, ३ एप्रिल रोजी गणित,

 belgaum

६ एप्रिल रोजी द्वितीय भाषा, १० एप्रिल रोजी विज्ञान, १२ एप्रिल रोजी तृतीय भाषा आणि १५ एप्रिल रोजी समाज या विषयाची परीक्षा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.