belgaum

अनिल बेनके स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित आमदार अनिल बेनके करंडक -2023 अखिल भारतीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील आज बुधवारी झालेल्या सामन्यांमध्ये जीजी बॉईज आणि एवायएम ए अनगोळ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय मिळविले

bg

शहरातील सरदार्स मैदानावर आज सकाळी झालेल्या पहिल्या सामन्यात जीजी बॉईज संघाने प्रतिस्पर्धी आर्मी इलेव्हन संघाला 31 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना जीजी बॉईज संघाने 8 षटकात 6 गडी बाद 84 धावा काढल्या. प्रत्युत्तरा दाखल आर्मी इलेव्हन संघाला 8 षटकात 6 गडी बाद 53 धावाच काढता आल्या.

या सामन्यात जीजी बॉईजच्या संदीप मकवाना याने सर्वाधिक 22 धावा काढल्या. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी जीजी बॉईज संघाचा संदीप मकवाना हा ठरला. दुसऱ्या सामन्यात एवायएम ए अनगोळ संघाने प्रतिस्पर्धी एसएसएस फाउंडेशन कणबर्गी संघावर 8 गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना एसएसएस फाउंडेशन कणबर्गी संघाने मर्यादित 10 षटकात 6 गडी बाद 92 धावा काढल्या.

एवायएम अनगोळ संघाने हे आव्हान 7.1 षटकात संपुष्टात आणताना 2 गडी बाद 93 धावा झळकाविल्या. एवायएम संघाच्या जय बनकर याने सर्वाधिक 36 धावा काढल्या. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी एवायएम ए अनगोळ संघाचा जय बनकर हा ठरला.

तिसऱ्या सामन्यात जीजी बॉईज संघाने प्रतिस्पर्धी इंडियन बॉईज बेळगाव संघाला 8 गडी आणि 29 चेंडू राखून पराजित केले. प्रथम फलंदाजी करताना इंडियन बॉईज बेळगाव संघाने मर्यादित 10 षटकात 7 गडी बाद 75 धावा काढल्या. प्रत्युत्तरा दाखल जीजी बॉईज संघाने 5.1 षटकात 2 गडी बाद एकूण 79 धावा काढून सामना जिंकला. जीजी बॉईज संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलताना संदीप मकवाना याने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करत 19 चेंडूत 51 धावांसह अर्धशतक झळकाविले.

Bankar
जय बनकर सोलापूर…

या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी जीजी बॉईज संघाचा संदीप मकवाना हा ठरला. आजच्या शेवटच्या चौथ्या सामन्यामध्ये मराठा स्पोर्ट्स बेळगाव संघाला प्रतिस्पर्धी एवायएम ए अनगोळ संघाकडून 21 धावांनी हार पत्करावी लागली. प्रथम फलंदाजी करताना एवायएम अनगोळ संघाने मर्यादित 10 षटकात सर्व गडी बाद 110 धावा झळकविल्या. प्रत्युत्तरा दाखल मराठा स्पोर्टस संघाला 9.4 षटकात सर्व गडी बाद 89 धावा काढता आल्या. या सामन्यात विजेत्या एवायएम ए अनगोळ संघातर्फे जय बनकर (39 धावा) व मनोज माने (26 धावा) यांनी उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले.

या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी एवायएम ए अनगोळ संघाचा जय बनकर हा ठरला. फलंदाजीत आजचे दोन्ही सामने गाजवून एवायएम अनगोळ संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावणारा नवा होतकरू टेनिस बॉल क्रिकेटपटू जय बनकर हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील आहे. आमदार अनिल बेनके करंडक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने तो यंदा पहिल्यांदाच बेळगावमध्ये खेळत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.