Friday, March 29, 2024

/

एसआरएस हिंदुस्तान, एसएसएस फाउंडेशन यांची प्रतिस्पर्ध्यांवर मात

 belgaum

अनिल बेनके स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित आमदार अनिल एस. बेनके करंडक -2023 भव्य खुल्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या आज सोमवारी दुसऱ्या दिवशी एसआरएस हिंदुस्तान आणि एसएसएस फाउंडेशन कणबर्गी या संघाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय मिळविले.

शहरातील सरदार्स मैदानावर आज सकाळी झालेल्या पहिल्या सामन्यात एचसीव्ही बेळगाव संघाने प्रतिस्पर्धी बेळगाव वॉरियर्स संघावर 35 धावांनी विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना एचसीव्ही बेळगाव संघाने मर्यादित 10 षटकात 7 गडी बाद 124 धावा काढल्या. प्रत्युत्तरादाखल बेळगाव वॉरियर्स संघाला मर्यादित 10 षटकात 7 गडी बाद 89 धावा काढता आल्या. या सामन्यातील सामनावीर पुरस्काराचा मानकरी संतोष सुळगे पाटील (एचसीव्ही) हा ठरला सामनावीर पुरस्कार वितरणास प्रमुख पाहुणे म्हणून भीमा गाडीवड्डर, नागेश अष्टेकर, मारुती बडसकर, शेट्टप्पा कागलकर व सिंदूर लक्ष्मण वल्लापूरकर हे उपस्थित होते.

दुसऱ्या सामन्यात एसआरएस हिंदुस्तान संघाने प्रतिस्पर्धी चॉईस इलेव्हन यमकणमर्डी संघाला 6 गडी राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना चॉईस इलेव्हन संघाने मर्यादित 10 षटकात 7 गडी बाद 78 धावा काढल्या हे आव्हान यशस्वीरित्या झेलताना एसआरएस हिंदुस्तान संघाने 7.1 षटकात 4 गडी बाद 80 धावा काढून सामना खिशात टाकला. या सामन्यातील सामनावीर पुरस्काराचा मानकरी प्राणेश नाईक (एसआरएस) हा ठरला. पुरस्कार वितरणास प्रमुख पाहुणे म्हणून इंद्रजीत पाटील, गुरुदेव पाटील, राघवेंद्र पाटील व प्रवीण पाटील उपस्थित होते.Benke trophy

 belgaum

तिसऱ्या सामन्यात एसएसएस फाउंडेशन कणबर्गी संघाने प्रतिस्पर्धी कॉलेज बॉईज खानापूर संघावर 8 गडी राखून एकतर्फी विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना कॉलेज बॉईज खानापूर संघाला 7.5 षटकात सर्वगडी बाद 57 धावा काढता आल्या. प्रतिउत्तरा दाखल एसएसएस फाउंडेशन संघाने अवघ्या 4.1 षटकात 2 गडी गमावून 58 धावा झळकविल्या. या पद्धतीने 23 चेंडू आणि 8 गडी शिल्लक असताना एसएसएस फाउंडेशन कणबर्गी संघाने हा सामना जिंकला. या सामन्यातील सामनावीर पुरस्काराचा मानकरी एसएसएस फाउंडेशन संघाचा हनुमंत कोकितकर हा ठरला त्याला प्रमुख पाहुणे आमदार ॲड. अनिल बेनके, संजय सुंठकर व सिद्धेश्वर दंग यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यातील विजेत्या संघांमध्ये आजचा शेवटचा सामना खेळविण्यात आला. या सामन्यात एसआरएस हिंदुस्तान संघाने प्रतिस्पर्धी एचसीव्ही बेळगाव संघावर 3 गडी राखून मात केली. प्रथम फलंदाजी करताना एचसीव्ही बेळगाव संघाने मर्यादित 10 षटकात 7 गडी बाद 101 धावा काढल्या एसआरएस हिंदुस्तान संघाने प्रत्युत्तरा दाखल 9.4 षटकात 7 गडी बाद 105 धावा काढून सामना जिंकला. या सामन्यातील सामनावीर पुरस्काराचा मानकरी गुरुप्रसाद अरोस्कर (एसआरएस) हा ठरला. पुरस्कार वितरणास प्रमुख पाहुणे म्हणून कल्लाप्पा गणगेर, सुनील मुरकुटे, अनिल केसरकर व सुरेश यादव उपस्थित होते.

आता उद्या मंगळवार दि 10 जानेवारी रोजी पुढील प्रमाणे सामने खेळविले जाणार आहेत. 1) फॅन्को स्पोर्ट्स क्लब वि. मुन्नाभाई (सकाळी 9 वा.), 2) शिव इलेव्हन खानापूर वि. मराठा स्पोर्ट्स बेळगाव (सकाळी 11 वा.), 3) आयोध्या इलेव्हन कडोली वि. हुक्केरी स्टार्स (दुपारी 1 वा.), 4) फौजी इलेव्हन वि. सरदार इलेव्हन (दुपारी 3 वाजता).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.