Friday, July 19, 2024

/

एव्हिएशन इंडस्ट्री करियरमध्ये यश मिळविलेला : कुशाल कुंभार

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर त्यासाठी जिद्द आणि चिकाटीची जोड असणे आवश्यक आहे. आपले ध्येय कसे गाठायचे हे ज्याला कळले आणि ज्यांनी ध्येयाचा पाठलाग करून ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न केले त्यांच्या हाती यश नक्कीच आले आहे. बेळगावच्या हत्तरगी येथील कुशाल प्रकाश कुंभार या तरुणाने बेळगावमधील ‘फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी’ या अकादमीच्या माध्यमातून एव्हिएशन इंडस्ट्रीचे प्रशिक्षण घेऊन यश मिळविले आहे.

संजय घोडावत संस्थेच्या पदवीपूर्व महाविद्यालयात विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम आणि एव्हिएशन विभागात डिप्लोमा अभ्यासक्रम करत बेळगावमधील ‘फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी’ या अकादमीच्या माध्यमातून एव्हिएशनचे संपूर्ण प्रशिक्षण घेतले. काही काळ बेंगळुरू येथे आणि त्यानंतर बेळगावमध्ये आपल्या कुटुंबासमवेत राहिलेल्या कुशालने एव्हिएशन इंडस्ट्रीजमध्येच आपले करियर करण्याचे ठरविले. सप्टेंबर २०२० मध्ये बेळगावमधील ‘फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी’ अकादमीत प्रवेश घेऊन येथील कुशल प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योग्य प्रशिक्षण घेतले.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच ‘जॉब इंटरव्ह्यू’ आणि योग्य प्रशिक्षण मिळाल्यामुळे पहिल्या टप्प्यातच झालेली निवड याचे श्रेय ‘फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी’ला जाते, असे कुशाल सांगतो.

‘फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी’मधील प्रशिक्षक सुश्मिता, जॉन, ओंकार, कोमल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ऑक्टोबर २०२२ साली गुडगाव येथे एजंट लेव्हल एक्झिक्युटिव्ह म्हणून कुशाल कार्यरत आहे.Kushal kumbhar

या अकादमीने प्रशिक्षणादरम्यान शिकविलेल्या सर्व गोष्टींचा जॉब इंटरव्ह्यूसाठी खूप मोठा फायदा झाला. भविष्यात पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून याच क्षेत्रात पुढे आणखीन प्रगती साधायची असून आपल्या या यशात ‘फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी’ने मोलाची साथ दिली, असे कुशालने सांगितले.

या अकादमीच्या माध्यमातून आजवर अनेक तरुण-तरुणींनी आपल्या करियरमध्ये उत्तम यश प्राप्त केले आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या तरुणांना या अकादमीच्या माध्यमातून खूप सहकार्य केले जाते. इतर एव्हिएशन प्रशिक्षण देणाऱ्या अकादमीच्या तुलनेत ‘फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी’ अकादमीची फी अत्यंत माफक आहे.

या अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० टक्के नोकरीची हमी देण्यात येते. शिवाय ज्याठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत त्याठिकाणी इंटरव्यू देण्यासाठी अकादमीचे मोठे सहकार्यही मिळते, हि या अकादमीची खासियत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.