belgaum

बेळगाव शहरांमध्ये आज शनिवारी दुपारपासून तीन महत्त्वाचे मोठे कार्यक्रम होणार असल्यामुळे शहराच्या प्रमुख रस्त्यावरील वाहतूक कॅम्प आणि क्लब रोड मार्गे वळविली जाण्याची शक्यता आहे.

शहरात आज शनिवारी दुपारी 1 वाजता सर्वप्रथम इस्कॉनची जगन्नाथ रथयात्रा निघणार आहे. ध. संभाजी महाराज चौकातून या रथयात्रेचा शुभारंभ होणार असून शहरातील मुख्य रस्त्यावरून फिरवून या रथयात्रेची सायंकाळी टिळकवाडी येथील इस्कॉन मंदिर मैदानात सांगता होणार आहे.

या मागोमाग ध. संभाजी महाराज चौक येथे आज सायंकाळी 6 वाजता धर्मवीर संभाजी महाराज स्मारकाचा भव्य असा लोकार्पण सोहळा होणार आहे. याच कालावधीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बेळगावात दाखल होणार असून त्यांनी आज सायंकाळी 6 वाजता डॉ. आंबेडकर रोडवरील एका खाजगी हॉटेलमध्ये भाजप नेत्यांची बैठक बोलावली आहे.

या पद्धतीने शहरात आज दुपारनंतर महत्त्वाच्या मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन होणार असून या कार्यक्रमांना अतिमहनीय व मान्यवर मंडळी हजेरी लावणार असल्यामुळे शहराच्या प्रमुख मार्गांवरील वाहतूक कॅम्प आणि क्लब रोड मार्गे वळवली जाण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.