belgaum

युनियन जिमखाना गोळीबार प्रकरण : पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे

0
Cop bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कॅम्प परिसरातील युनियन जिमखाना येथील रमी क्लबमध्ये १४ जुलै रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या तपासाला पोलिसांनी गती दिली आहे. या प्रकरणात आणखी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये रोहन पोकळे (रा. पुणे) आणि आदिराज अनिल सुतार (रा. कामत गल्ली, बेळगाव) यांचा समावेश आहे. तपासादरम्यान या प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे.

प्राथमिक चौकशीत सुरेश जालगार आणि प्रफुल्ल पाटील यांच्यातील आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा संबंध रमी क्लब आणि जुगार अड्ड्यांशी असण्याची शक्यता पोलिस तपासत आहेत.

 belgaum

या प्रकरणात सर्वप्रथम रोहन पोकळे याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आदिराज अनिल सुतार याला बेळगावातून अटक करण्यात आली. दोघांच्या ताब्यातून दोन गावठी पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्रकरणातील मुख्य आरोपीसह इतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.