belgaum

बार कौन्सिलच्या नूतन सदस्यांचा बेळगावात गौरव

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्य बार कौन्सिलवर निवड झालेल्या नव्या सदस्यांचा बेळगाव बार असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी वकिलांच्या कल्याणासाठी आवश्यक सुविधा आणि आर्थिक सहाय्य वाढविण्याच्या मागण्या मांडण्यात आल्या.

बार असोसिएशनचे अध्यक्ष बी. जे. गंगाई यांच्या अध्यक्षतेखाली या कार्य्रक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना बी. जे. गंगाई यांनी वकिलांच्या हितासाठी बार कौन्सिलने प्राधान्याने काम करण्याची गरज व्यक्त केली. सध्या वकिलांना मिळणारी ८ ते १२ लाख रुपयांची भरपाई रक्कम वाढवून १५ ते २० लाख रुपये करण्यात यावी, अशी मागणी केली.

वकिलांच्या वेल्फेअर फंडमधून मिळणाऱ्या सुविधांचा अधिक प्रभावी वापर करून गरजू वकिलांना वैद्यकीय मदत आणि आपत्कालीन सहाय्य उपलब्ध करून द्यावे, असे त्यांनी सांगितले. तसेच बार असोसिएशनच्या कामासाठी जागेची कमतरता असून, बेंगळुरूपुरत्या मर्यादित असलेल्या मूलभूत सुविधा उत्तर कर्नाटकातील वकिलांनाही उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

 belgaum

बेळगावच्या नवीन न्यायालय संकुलातील वकील समुदाय भवनात झालेल्या या कार्यक्रमात आय. एम. पाटील, कल्मेश किवड, ए. ए. मगदूम, बी. व्ही. कोरीमठ आणि व्ही. डी. कामारेड्डी यांचाही सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात केएलएसचे अध्यक्ष ए. के. तगरे, सचिव एस. व्ही. गणाचारी, व्ही. एम. देशपांडे, केएलएस जीसीसीचे अध्यक्ष आर. एस. मुतालिक आणि प्राचार्य डॉ. व्ही. एस. जळिहाळ यांच्यासह बार असोसीएशनचे पदाधिकारी, व्यवस्थापन मंडळ, कर्मचारी आणि वकील उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.