Friday, April 19, 2024

/

हुंचेनट्टी येथे राहुल जारकीहोळी फॅन्स क्लबचे उद्घाटन

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव दक्षिण मतदार संघाच्या हद्दीत येणाऱ्या मच्छे या गावातील हुंचेनट्टी येथे राहुल सतीश जारकीहोळी फॅन्स क्लबचा उद्घाटन सोहळा पार पडला.

बेळगाव दक्षिण मतदार संघात सतीश जारकिहोळी यांनी जन संपर्क वाढवायला सुरुवात केली आहे मागील लोकसभा पोटनिवडणुकी पासून सतीश जारकिहोळी यांनी संपर्क वाढवला असून पुन्हा ते सक्रिय झाले असून दक्षिणेत संपर्क वाढवत आहेत.

युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या माध्यमातून जनसेवा करण्यात येत असून सातत्याने जनसंपर्कांत राहणाऱ्या राहुल जारकीहोळी यांच्यामुळे अनेक तरुणांना प्रोत्साहन मिळत आहे.

 belgaum

राहुल जारकीहोळी फॅन्स क्लबच्या माध्यमातून तरुणांना उपयुक्त असे उपक्रम राबविण्यात येत असून राहुल जारकीहोळी आणि राहुल जारकीहोळी फॅन्स क्लबच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांचा तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सतीश जारकीहोळी यांनी केले.Satish jarkiholi

यावेळी मनोगत व्यक्त करताना राहुल जारकीहोळी म्हणाले, मतदारसंघातील युवकांनी काँग्रेस पक्षासाठी काम करण्यासाठी मोठ्या मनाने सहभागी होणे आवश्यक आहे.

राहुल जारकीहोळी फॅन्स क्लबच्या माध्यमातून युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत असून आपण युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे राहुल जारकीहोळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.