Friday, September 20, 2024

/

महाराष्ट्राचा धारदार वार… शरद पवार!!!

 belgaum

84 वे वय ज्यांना थोपवू शकत नाही ,डोळ्यावर नुकतीच झालेली शस्त्रक्रिया ज्यांना रोखू शकत नाही… सत्तेच्या संघर्षात अनेक झालेले वार ज्यांना हरवू शकत नाहीत ते महाराष्ट्राचे दमदार नेते शरद पवार सध्या चालू असलेल्या सीमाभागाच्या राजकीय घडामोडीत दाखल झाले आणि एकंदर परिस्थितीचा नूरच बदलला..

खासदारकीच्या निवडणुकीत शरद पवारांना सोडून गेलेल्या उदयनराजेंना उभ्या पावसात भिजत शरद पवारांनी धोबी पछाड दिला आणि शरद पवारांची ताकत परत एकदा महाराष्ट्राने नोंदवून घेतली. महाराष्ट्राचा हा बाहुबली नेता यात लढ्यात उतरतो हे पाहिल्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकार मधील भाजप सरकार हतबल झाले. प्रसंग बाका तिथं माझा टाका म्हणत शरद पवारांनी कर्नाटकला 48तासांचा अल्टिमेटम दिला.परिस्थिती सुधारा नाहीतर मला बेळगावला यावे लागेल या एकाच वाक्याने भाजपने रचलेला राजकीय डाव शरद पवारांनी सुरुंग लावत उधळून लावला.अख्ख बेळगाव..शरद पवारांच्या या वाक्याने हेलावून गेलं .

संघर्षाची तयारी करून बेळगावकर लढण्यासाठी सज्ज झाला.रात्री कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी झटक्यात शांतता पसरवण्याचे आश्वासन दिले.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार साहेबाना बेळगावला जावं लागणार नाही याची ग्वाही दिली.

Pawar sharad
Sharad Pawar

भाजप नेत्यांना डॅमेज कंट्रोल कसे करायचा हेच कळेना झाले. महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांना तोंडाला फेस येईपर्यंत मुलाखती द्याव्या लागल्या. पवार नावाचा वार भाजपला घायाळ करून गेला. सगळी परिस्थिती निवलायला सुरुवात झाली आणि भाजपची खेळी आता त्यांच्यावरच उलटली.सीमावर्ती भागात येण्याच्या वल्गना करून सीमासमन्वयक मंत्री बेळगावात पोहोचलेच नाहीत .

पवारांनी मात्र चाणक्य खेळी करून परत एकदा बाजी मारून नेली.महाराष्ट्राची ही ताकत मात्र सीमावर्ती भागाला सुखावून गेली.बेळगावसह सीमाभागातील मराठी जनता म्हणूनच म्हणते आमची ‘पवार हीच पॉवर आहे!!!,,’

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.