belgaum

माजी सैनिक खून प्रकरणात मोठी कारवाई; आणखी 7 जण जेरबंद

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :घोडगेरी (ता. हुक्केरी) येथील माजी सैनिक संदीप मंजरगी यांच्या अमानुष खून प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आणखी सात जणांना अटक केली आहे. यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता नऊवर पोहोचली आहे.


या प्रकरणात यापूर्वी मयत संदीप मंजरगी यांची पत्नी सुमा मंजरगी आणि तिचा प्रियकर पुंडलिक यांना अटक करण्यात आली होती. विम्याच्या दोन कोटी रुपयांच्या रकमेवर डोळा ठेवून सुमाने प्रियकराच्या मदतीने पतीचा सलाईनमधून विष देऊन खून केल्याचा आरोप आहे.


पोलीस चौकशीत सुमा आणि पुंडलिक यांनी खून प्रकरण दडपण्यासाठी मदत करणाऱ्यांची नावे उघड केल्यानंतर आरएमपी डॉक्टर बसवराज भस्मे, बेळगाव पोलीस आयुक्तालयातील एफडीए अशोक गुजनाळ तसेच दोन एफएसएल अधिकाऱ्यांसह आणखी सात जणांना अटक करण्यात आली.

 belgaum


सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांची हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. यमकनमर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेला हा गुन्हा आता पुढील तपासासाठी घटप्रभा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.


दरम्यान, माजी सैनिक संदीप मंजरगी यांचा पुरलेला मृतदेह पुन्हा उकरून काढून तो विधिविज्ञान प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. या अहवालानंतर प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या बाबींवर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.