Friday, April 19, 2024

/

नूतन बेळगाव सीबीटी बसस्थानकाचे 27 रोजी उद्घाटन

 belgaum

बेळगाव शहरवासियांची प्रतीक्षा आता समाप्त होणार असून नव्याने बांधण्यात आलेल्या बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाचे येत्या मंगळवार दि. 27 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते अधिकृत उद्घाटन होणार आहे.

बेळगाव मध्यवर्तीय बस स्थानकाचे नूतनीकरण करण्याची योजना 2009 पासून आखली जात होती. त्यानंतर बस स्थानक नूतनीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात 28 जानेवारी 2017 रोजी झाली. बस स्थानक नूतनीकरणाचा हा प्रकल्प 24 महिन्यात पूर्ण करावयाचा होता. बसस्थानक कार्यान्वित करण्यासाठीच्या मूलभूत पायाभूत सुविधा आणि स्थानकाची इमारत सध्या तयार असली तरी अन्य काही कामे पूर्ण होणे बाकी आहेत.

निर्धारित वेळापत्रकानुसार या बस स्थानकाचे नूतनीकरण जानेवारी 2019 पर्यंत पूर्ण व्हावयास हवे होते मात्र दुर्दैवाने तसे घडले नाही. बस स्थानक नूतनीकरणाचा भूमिपूजन समारंभ 3 डिसेंबर 2016 रोजी झाला आणि प्रत्यक्ष काम 2017 मध्ये सुरू झाले.

 belgaum

बेळगाव मध्यवर्ती बस स्थानक नूतनीकरणासाठी 24 महिन्यांची मुदत देण्याबरोबरच 32,48,54,759.59 रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून या कामाचे कंत्राट मन्साराम विक्रम पवार (हर्षा कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड) यांना देण्यात आले आहे. या नूतनीकरण प्रकल्पात नवे आधुनिक बस स्थानक बांधणे, पार्किंग एरिया पेेव्हमेंट काँक्रीटकरण, शहर बस स्थानक निवारा पाणीपुरवठा स्वच्छता विषयक बाबी इलेक्ट्रिकल एच. टी. वर्क्स वायरिंग लाइटिंग अग्निशमन वगैरे मुख्य अभियंत्यांनी सुचविलेल्या विकास कामांचा समावेश आहे. एनडब्ल्यूकेआरटीसीचे बेळगाव बस स्थानक हे शहराच्या मध्यवर्ती भागात 3.08 एकर जागेत विस्तारले आहे त्याला लागूनच एनडब्ल्यूकेआरटीसी डिव्हिजनल वर्कशॉप 4.68 एकर जागेत स्थापित आहे. Cbt bldg

नूतनीकरण करण्यात आलेल्या बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकामध्ये बसेसच्या पार्किंग व वर्दळीच्या जागेसह एकूण 41 बस फलट आहेत. त्याचप्रमाणे ऑटो रिक्षा लेन, टॅक्सी पार्किंग लेन, खाजगी वाहनांसाठी बेसमेंट पार्किंग, प्रवाशांसाठी आगमन व प्रस्थानद्वार, बस

स्थानकाच्या टर्मिनल इमारतीमध्ये प्रवाशांसाठी वेटिंग एरिया, तिकीट /रिझर्वेशन काउंटर्स, क्लॉक रूम, प्रथमोपचार कक्ष, वेटिंग रूम, प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, यात्री निवास आदी सुविधा, उपहारगृह, दुकाने, प्रशासकीय कार्यालय, पार्सल ऑफिस वगैरेंची सोय करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.