Friday, April 26, 2024

/

संजय राऊतांचा ‘सर्जिकल स्ट्राईकचा’ इशारा!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नावरून दोन्ही राज्यात सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी बुधवारी नवे विधान केले असून ‘ज्याप्रमाणे चीन देशात घुसले तसे आम्ही कर्नाटकात प्रवेश करू’, यासाठी आम्हाला कुणाच्याही परवानगीची गरज नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. सीमाप्रश्न आम्हाला चर्चेतून सोडवायचा आहे, पण कर्नाटकचे मुख्यमंत्री याप्रश्नी गर्ल ओकत असून महाराष्ट्रात देखील कमकुवत सरकार असल्याने याप्रश्नी कोणतीही ठाम भूमिका घेत नसल्याची टीका त्यांनी केली.

महाराष्ट्र सरकारचे अधिवेशन सुरु असून या अधिवेशनात सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारला टीकेचा धनी व्हावे लागले असून या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधकांच्या गदारोळाचा सामना करावा लागत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याआधी विधानसभेत सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला असून गृहमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीनुसार दिलेल्या सूचना कर्नाटकाने आणि जिल्हा प्रशासनाने पाळल्या नसल्याबद्दल निषेध व्यक्त केला आहे.

 belgaum

शिवाय गृहमंत्र्यांच्या सूचनांचे पालन बेळगावचे जिल्हाधिकारी कसे काय करत नाहीत असा सवालही उपस्थित केला आहे. सीमावादावर राजकारण न करता सीमावासियांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकारने उभे राहिले पाहिजे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकार या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे सांगितले आहे.

सीमामेळाव्याला परवानगी नाकारून मराठी माणसावर दडपशाही करणे, लोकशाहीची पायमल्ली करणे अशा गोष्टी वारंवार होत असून सीमावासीयांवर होणारा अन्याय थांबविण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकात घुसून दाखवू असा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.