Tuesday, July 23, 2024

/

छेडछाडीतून चौघांवर चाकू हल्ला

 belgaum

महाविद्यालयीन विद्यार्थिनीची एका विद्यार्थ्याने छेड काढल्याचा जाब विचारल्याने झालेल्या संघर्षात चौघांवर चाकूने वार करून भोसकल्याची घटना बैलहोंगल शहरात घडली. या घटने नंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बैलहोंगल शहरातील बसवेश्वर आश्रय कॉलनीत मंगळवारी रात्री छेडछाडीचा जाब विचारल्याने चौघांवर चाकूने वार करून भोसकल्याची घटना घडली. विद्यार्थिनीच्या विनयभंगाबाबत बसवेश्वर कॉलनीत ताकीद देण्यासाठी गेले असता तिचे आई-वडील व वडीलधाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला.

सादिक मणियार याने आपल्याच समाजातील विद्यार्थिनीची छेड काढल्यावरून चौकशी करून समजूत घालण्यासाठी गेले असता सादिकसह त्याचे मित्र चौडाप्पा बंडीवड्डर, पुरकान जमादार, रमजान नदाफ व इतरांनी मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.Four injured

या घटनेत अताउल्ला हुबळी, मुनिर बेपारी, रफिक कोरविनकोप्प, मेहबूब हुबळी हे चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना बैलहोंगल येथील आणि बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सीपीआय यू ए सातेनहळ्ळी यांनी घटनास्थळी भेट देत तपास केला. याप्रकरणी बैलहोंगल पोलीस ठाण्यात मुलीचा विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.