Sunday, April 21, 2024

/

सतीश जारकीहोळी यांच्या कडून आणखी एक वादग्रस्त वक्तव्य

 belgaum

केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांना हिंदू शब्दाबद्दल स्वतः केलेले वादग्रस्त वक्तव्य मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करावी लागली. मात्र निपाणी मधील ज्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं त्याच कार्यक्रमात धर्मवीर छ. संभाजी महाराजांच्या आणि छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य करून जारकीहोळी यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. कारण यासंदर्भात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ट्वीटच्या माध्यमातून जाब विचारला आहे.

निपाणी येथे मानव बंधुत्व वेदिके या संस्थेच्या कार्यक्रमात केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी ‘हिंदू’ हा शब्द पर्शियन भाषेतील आहे. या पद्धतीचे वक्तव्य केल्याने वादंग निर्माण झाला होता. त्यानंतर जारकीहोळी यांनी थेट मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्र पाठवून दिलगिरी व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे आपण आपले वक्तव्य मागे घेत आहोत असेही जाहीर केले आहे.

मात्र निपाणी येथील त्याच कार्यक्रमात आमदार सतीश जारकीहोळी यांनी आपल्या हिंदीतील भाषणात ‘संभाजी महाराज शिवाजी महाराजा बाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे ते वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

या वक्तव्याची गंभीर दखल महाराष्ट्रातील भाजपचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. फडणवीस यांनी आमदार सतीश जारकीहोळी यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध देशातील काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे ट्विटद्वारे प्रकट केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेली वादग्रस्त क्लिप जोडून छ. संभाजी महाराज यांच्याबद्दल तुमच्या पक्षाच्या आमदाराच्या या संवेदनाहीन, दिशाभूल करणाऱ्या आणि खोट्या अवमानकारक वक्तव्याशी आपण तरी सहमत आहात का? हे तुमच्या काँग्रेस पक्षाचे अधिकृत वक्तव्य आहे का? महाराष्ट्र हे कदापी सहन करणार नाही! अशा शब्दात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटच्या माध्यमातून राहुल गांधी यांना जाब विचारला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.