Sunday, April 28, 2024

/

बेळगावच्या 6 जणांचे ‘आयर्न मॅन गोवा’ शर्यतीत सुयश

 belgaum

बेळगावच्या दोन महिलांसह एकूण 6 ट्रायथलीट्सनी गोवा येथे आयोजित ‘आयर्न मॅन 70.3 गोवा’ ही खडतर शर्यत यशस्वीरित्या पूर्ण केली असून बेळगावसाठी ही अत्यंत अभिमानास्पद घटना आहे. डॉ. अमित पिंगट यांच्यासह वेणूग्राम सायकलींग क्लब बेळगावचे संतोष शानभाग, मयुरा शिवलकर, श्रेया सुंठणकर, इंद्रजीत हलगेकर आणि रोहन हरगुडे हे ते सहा ट्रायथलीट्स आहेत.

आयर्न मॅन 70.3 गोवा ही शर्यत आज रविवारी सकाळी अपूर्व उत्साहात यशस्वीरित्या पार पडली. पणजी गोवा येथील मिरामार बीच येथून सुरू झालेल्या या शर्यतीत 1450 ट्रायथलीटनी भाग घेतला होता. यामध्ये भारतासह 33 देशातील अनुभवी तसेच नवोदित आणि हौशी ट्रायथलीट्सचा समावेश होता. 2022 आयर्न मॅन 70.3 गोवा ही शर्यत म्हणजे 2023 च्या आयर्न मॅन 70.3 शर्यतीच्या पात्रता फेरी गाठण्यासाठीची संधी होती.

आयर्न मॅन 70.3 गोवा शर्यतीमध्ये स्पर्धाकांनी समुद्रात 1.9 कि. मी. खडतर अंतर पोहून पूर्ण करणे, शिवाय 90 कि. मी. सायकलिंग करणे आणि 21 कि. मी. धावणे या क्रीडा प्रकारांचा समावेश होता.

 belgaum

बेळगावच्या ट्रायथलॉनपटूंमध्ये संतोष शानभाग यांनी ही आयर्न मॅन शर्यत 6:22:35 इतक्या सर्वात कमी वेळेत यशस्वीरित्या पूर्ण केली. इतर ट्रायथलाॅनपटूंपैकी श्रेया सुंठणकर यांनी 6:58, मयुरा शिवलकर 7:29, डॉ अमित पिंगट 7:52, रोहन हरगुडे 7:55, इंद्रजीत हलगेकर यांनी 7:56 इतक्या वेळेत शर्यत पूर्ण केली.Goa ironman

संतोष शानभाग यांनी यापूर्वी 2017 मध्ये मलेशियातील आयर्न मॅन शर्यत आणि त्यानंतर जुलै 2022 मध्ये गोल्डन इंग्लंड येथील आयर्न मॅन युके शर्यत यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. संतोष यांनी 2018 मध्ये श्रीलंकेत झालेल्या आयर्न मॅन शर्यतीमध्ये तसेच 2019 मध्ये गोव्यात झालेल्या आयर्न मॅन ट्रायथलाॅन स्पर्धेतही भाग घेतला होता.

मयूरा शिवलकर आणि त्यांचा मुलगा मेघ शिवलकर यांनी यापूर्वी आयर्न मॅन कझाकस्तान नूर -सुलतान आयर्न मॅन शर्यत यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. तत्पूर्वी मयुरा यांनी फेब्रुवारी 2018 मध्ये आयोजित आयर्न मॅन कोलंबो शर्यतीत सफलता मिळवली होती. श्रेया सुंठणकर हिने यापूर्वीच्या आयर्न मॅन गोवा शर्यतीत सुयश मिळविले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.