Saturday, April 20, 2024

/

दुरुस्तीसाठी ‘हा’ नवा उड्डाणपूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद

 belgaum

चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कांही दिवसापूर्वी टिळकवाडी तिसरे रेल्वे गेट येथील नूतन उड्डाणपूल लोकार्पण करण्यात आला. मात्र पुलाच्या अर्धवट अवस्थेतील विकास कामांचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत असून आता दुरुस्तीच्या कारणास्तव सध्या तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्यामुळे सखेद आश्चर्य होत आहे.

तिसरे रेल्वे गेट उड्डाणपूल प्रकल्पाचा कोनशीला समारंभ गेल्या 6 जानेवारी 2019 रोजी झाला. त्यानंतर पुलाच्या प्रत्यक्ष बांधकामाला 12 ऑक्टोबर 2022 मध्ये प्रारंभ झाला आणि दुरुस्तीचे काम 14 ऑक्टोबर 2022 रोजी हाती घेऊन आता 17 ऑक्टोबर 2022 रोजी हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

मेसर्स कृषी इन्फ्राटेक या कंपनीला उड्डाण पुलाच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले आहे. चार वर्षानंतरही अर्धवट अवस्थेत असलेला सदर उड्डाणपूल खुला केल्यानंतरही वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी या नव्या कोऱ्या पुलाच्या रस्त्यावर खड्डा पडला आणि ज्याची व्यवस्थित दुरुस्तीही करण्यात आलेली नाही.

याखेरीज उद्घाटनानंतर उड्डाणपुलाची रंगरंगोटी अद्याप सुरूच आहे. उड्डाणपुलाची फक्त एका बाजूची रंगरंगोटी करण्यात आली होती. हॉटेल नेटिव्हच्या बाजूची रंगरंगोटी आता केली जात आहे. तिसऱ्या रेल्वे गेट येथील उडान पुलाची कामे अर्धवट स्थितीत ठेवूनच त्याचे लोकार्पण केले असल्याने नाराजी दिसून येत आहे.Rob

दरम्यान दुरुस्तीच्या कारणास्तव सदर उड्डाणपूल सध्या बंद ठेवण्यात आल्यामुळे खानापूर रोडकडून येणारी वाहने उड्डाणपूला ऐवजी काँग्रेस रोड वरून सोडली जात आहेत. त्यामुळे रेल्वे फाटक बंद झाल्यानंतर या भागात पुन्हा वाहतूक कोंडी होत असून वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. खानापूर रोड वरून येणारी वाहने सुरुवातीची दोन-तीन दिवस पुलावरून जात होती.

यामुळे अडचण निर्माण होत असल्याने शनिवारी सकाळपासून खानापूर रोड परिसरात बॅरिकेट लावण्यात आले आहेत. त्यामुळे खानापूर व इतर भागातून येणारी वाहने तिसरे रेल्वे फाटक आणि काँग्रेस रोड वरून जात आहेत. मात्र रेल्वे फाटक बंद झाल्यानंतर या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे पूल सुरू झाला तरी येथील वाहतूक कोंडीची समस्या कायम असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.