Friday, September 20, 2024

/

अंगणवाडी भरती प्रक्रियेसाठी हजारो अर्ज दाखल

 belgaum

बेळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रातील २५४ रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठी १४ तालुक्यातून ५,३३१ अर्ज ऑनलाईन माध्यमातून दाखल झाले आहेत. अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाईन अर्जाची मुदत संपली असून आता निवड प्रक्रियेत अधिकाऱ्यांची मोठी दमछाक होणार आहे.

अंगणवाडी केंद्रातील रिक्त जागांसाठी प्रामुख्याने शेतकरी, विधवा, ६० टक्क्यांहून अधिक दिव्यांग महिलांना प्राधान्य दिले जाणार असून या भरतीसाठी हजारो अर्ज दाखल झाल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे.

संबंधित महिलांचे अर्ज नसल्यास इतर महिलांचा विचार केला जाणार असून हजारो अर्जातून २५४ जागांवरील भरती प्रक्रियेसाठी अधिकारी वर्गाची कसोटी लागणार आहे.

२५४ जागांसाठी बेळगाव शहरातून ३७६, बेळगाव ग्रामीण भागातून ६७४, खानापूरमधून ३६८, निपाणी ४६८, चिकोडी २४३, अरभावी ४११, अथणी ३०४, बैलहोंगल ४३५, गोकाक २१६, हुक्केरी ४७२, कागवाड २५२, रायबाग ४६८, रामदुर्ग ३०१. सौंदत्ती ३४३ असे एकूण ५३३१ अर्ज दाखल झाले आहेत.

जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे सर्व कारभार ऑनलाईन पद्धतीने व्हावेत यासाठी अंगणवाड्यांचे रूपांतर स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये करण्यात आले आहे. यासाठी अंगणवाडी सहाय्यिकांना स्मार्ट फोन वितरित करण्यात आले असून कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी राष्ट्रीय पोषण अभियान राबविले जात आहे. यामुळे अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून रिक्त अंगणवाड्यांमध्ये मदतनिसाचीही भरती केली जाणार आहे.

कमी जागांसाठी आलेल्या हजारो अर्जांमधून भरती प्रक्रिया राबविणे हे कसोशीचे काम असून अलीकडे अंगणवाडीत होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील भ्रष्टाचाराला स्मार्ट अंगणवाड्यांमुळे छाप बसण्याचीही शक्यता आहे. भरती प्रक्रियेसाठी वशिला, आर्थिक देवाण घेवाण अशा प्रकारांना ऊत आला असून आपल्याला स्थान कसे मिळविता येईल यासाठी अनेकांची रस्सीखेचही सुरु आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.