belgaum

पंखिदा-2022 या कार्यक्रमांतर्गत परिपूर्ण नवरात्र उत्सवाची संधी बेळगावकरांना उपलब्ध झाली शुक्रवारपासून मंगळवार दिनांक 4 ऑक्टोबर पर्यंत पंखीदा खुला असणार आहे.

bg

दररोज दांडिया गरबा बरोबरच विविध स्पर्धा देखील आयोजित करून या पंखीदा कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत केला जात आहे. रविवारी समूह नृत्य स्पर्धांचे आयोजन करून सदर सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्यात आला.

रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम व राजस्थानी युवा मंच, रोट्रॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने दांडिया गरबा अर्थात पंखीदा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक उपक्रम समोर ठेवत निधी संकलनासाठी हा उपक्रम तिन्ही संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येत असून सदर उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभत आहे.Pankhida

गरबा दांडिया समूह स्पर्धेत साधारण पंचवीस फोन अधिक संघांनी सहभाग घेतला होता बेळगाव बरोबरच कोल्हापूर येथून देखील गरबा दांडिया समूह स्पर्धेसाठी दाखल झाले होते.दररोज गरबा-दांडियाच्या ठेक्यावर शगुन गार्डन फुलत असताना स्पर्धेला देखील उत्तम प्रतिसाद लाभला. सानेडो (sanedo)ग्रुप प्रथम,खेलैया (khelaiya) ग्रुप कोल्हापूर द्वितीय, रासलीला ( Raslila)ग्रुप बेळगांव तृतीय यांनी अनुक्रमे तीन क्रमांक मिळविले.

मागील तीन दिवसापासून नवरात्र उत्सवाची धूम गरबा दांडियाच्या माध्यमातून अधिकच खुलत असताना पंखीदा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी पार्थ डी 9480332831 ऋषभ मुंदडा 7411831104 वृंदा तपाडिया 8095366546 गौरव जे9986902526 यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.