Sunday, July 21, 2024

/

बेळगावची अंतरा कुलकर्णी ‘सुर नवा ध्यास नवा’ची उपविजेती

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील गोगटे वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी अंतरा कुलकर्णी हिने बेळगावचा नावलौकिक वाढवताना कलर्स मराठी वाहिनीच्या ‘सुर नवा ध्यास नवा’ या गायनाच्या लोकप्रिय रियालिटी शोचे उपविजेतेपद पटकाविले आहे.

विद्यानगर थर्ड क्रॉस येथील रहिवासी असणारी 16 वर्षीय अंतरा कुलकर्णी ही गोगटे पदवी पूर्व वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षात शिकत आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुर नवा ध्यास नवा’ या स्पर्धात्मक गायन रियालिटी शो मधील निवडक 15 स्पर्धकांमध्ये अंतरा ही सर्वात लहान वयाची स्पर्धक होती हे विशेष होय.

‘सुर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाच्या अंतिम फेरीचे परीक्षक सुप्रसिद्ध गायक महेश काळे आणि अवधूत गुप्ते हे होते. या कार्यक्रमामुळे अंतरा कुलकर्णी हिला सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित, काजोल, हिमेश रेशमिया एस.पी.बी सर, सुरेश वाडकर, साधना सरगम साधू कोकिला वगैरे मान्यवरांना भेटण्याची संधी प्राप्त झाली.Antara Kulkarni

सुर नवा ध्यास नवा कार्यक्रमाचे उपविजेतेपद पटकावून अंतरा कुलकर्णी हिने बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अंतरा हिने शास्त्रीय संगीताचे धडे मंजुश्री खोत यांच्याकडून तर स्वरांचे धडे रफिक शेख यांच्याकडून घेतले आहेत.

सध्या ती कोल्हापूरच्या स्नेहा राजुरीकर यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेत आहे. सुर नवा ध्यास नवा मधील यशाबद्दल अंतरा कुलकर्णी हिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.