belgaum

दसऱ्यानिमित्त सरदार मैदानावर आयोजित सांस्कृतिक क्रीडा महोत्सव अंतर्गत बेळगाव शहराचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून आज रविवारी शालेय मुला -मुलींची चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली.

आयोजकांच्या नियोजनानुसार ही चित्रकला स्पर्धा आज सरदार मैदानावर घेण्यात येणार होती. मात्र पावसाची शक्यता लक्षात घेऊन नजीकच्या महिला विद्यालय इंग्रजी व मराठी माध्यम शाळेसह जी. ए. महाविद्यालय आणि सरदार मैदानावरील सभागृहामध्ये विविध गटात ही स्पर्धा घेण्यात आली.

चित्रकला स्पर्धेसाठी युकेजीसह इयत्ता 1 ली आणि 2 री पर्यंतच्या गटासाठी ‘राष्ट्रीय ध्वज आणि परिसर’, इयत्ता 3 री ते 7 वी गटासाठी ‘स्वच्छ भारत अभियान आणि इस्त्रो स्पेस शटल’ आणि इयत्ता 7 वी ते 10 वीच्या गटासाठी ‘हर घर तिरंगा ,भाजी मार्केट’ हा विषय देण्यात आला होता. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी भारतीय सेना, दांडिया रास, गरबा व दांडिया स्पर्धा घेण्यात आल्या.Benke drawing competation

आमदार ॲड. अनिल बेनके यांनी चित्रकला स्पर्धांचे निरीक्षण करून स्पर्धेत सहभागी विद्यार्थी -विद्यार्थिनींच्या कलेचे कौतुक केले. त्याचप्रमाणे मुला-मुलींना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी स्वतः राष्ट्रध्वजाचे चित्र काढून साऱ्यांचे लक्ष वेधले.

यावेळी बोलताना सदर स्पर्धेला विद्यार्थी विद्यार्थिनींनी अपेक्षेपेक्षा जास्त उत्तम प्रतिसाद दिल्याचे सांगून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या शिक्षण विभागाचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आभार मानले. आजच्या या चित्रकला स्पर्धेत 2 हजारांहून अधिक विद्यार्थी -विद्यार्थिनींनी भाग घेतल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.