belgaum

समाजात गुणवत्ता महत्त्वाची असते.खेळ हा जीवनात ऐक्य घडवितो .शिक्षणाने मनुष्याला लौकिकता मिळते.विद्यार्थी शिक्षक व पत्रकार हे महत्त्वाचे घटक आहेत.त्यासाठी सन्मान करणे,आदराची भावना ठेवणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे असे मौल्यवान विचार मा.आम.परशुरामभाऊ नंदिहळी यांनी कावळेवाडीत वाचनालयच्या सन्मान समारंभात व्यक्त केले
अध्यक्षस्थानी विजयराव नंदिहळी उपस्थित होते.
प्रारंभी म.गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहारअर्पण करून अभिवादन करण्यात आले.

bg

प्रास्ताविक वाय.पी.नाईक यांनी करून वर्षभरातील उपक्रमाची माहिती दिली.वाचनालयातील पुस्तके वाचावित तसेच खेळालाही प्रोत्साहन दिले जाईल असे सांगितले
व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत सन्मानचिन्ह ,गुलाबपुष्प देऊन करण्यात आले
गावातील उदयोन्मुख कुस्तीगिर रवळनाथ कणबरकर व गावची पहिली महिला कुस्तीपटू किरण बुरूड यांना प्रत्येकी पाच हजार ,गौरवपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
बिजगरणीची कन्या तेजस्वीनी कांबळे व मणूर गावचा गुणवंत धावपटू राष्ट्रीयपातळीवर सुवर्णपदक विजेता तुषार भेकणे यांनाही प्रत्येकी एक हजार व मेडल,गौरवपत्र देऊन प्रोत्साहित केले.

क्रीडाशिक्षक प्रकाश शेळके ,सिद्धेश्वर तुर्केवाडकर यांनाही गौरवपत्र सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलेयावेळी म.गांधी जयंतीचे औचित्य साधून समाजातील महत्त्वाचे योगदान देणारे पत्रकारबंधूचाही अण्णापा पाटील,प्रल्हाद चिरमुरकर, जोतिबा मुरकुटे यांचाही गौरवपत्र,शाल,सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले
याप्रसंगी नागेश मनोळकर,मनोहर बेळगावकर,मोहन मोरे,पी.आर.गावडे,अँड नामदेव मोरे,तेजस्वीनी कांबळे,यशवंतराव मोरे,प्रल्हाद चिरमुरकर,प्रकाश शेळके यांनीही आपल्या भाषणातुन प्रशंसोद्गगार काढले.
आपल्या अध्यक्षीयभाषणात विजयराव नंदिहळी यांनी असे सन्मान समारंभ आयोजित करणे आवश्यक आहे.त्यातुन उमेद मिळते .ख-याअर्थाने ग्रामीण भागातील गुणवत्तेला या म.गांधी सामाजिक संस्थेने प्रेरणा देण्याचं कौतुकस्पद कार्य चालू ठेवले आहे .सर्वानी एकत्रित येऊन अशा खेळाडूना निधी जमाकरून देण्याची खरी गरज आहे.असेप्रतिपादन केले.

Sports man felicited
यावेळी व्यासपीठावर माजीआमदार गुरूवर्य परशुरामभाऊ नंदिहळी,विजय नंदिहळी,मोहन मोरे, अरुण कणबरकर,दयानंद यळुरकर,मनोहर बेळगावकर,नागेश मनोळकर,जोतिबा बा.मोरे,वकील नामदेव मोरे,संस्थेचेअध्यक्ष वाय.पी.नाईक,मोणापा यळुरकर हजर होते.
कार्यक्रमाला गावातील केदारी कणबरकर,गौतम कणबरकर,

एम.पी.मोरे.रामू जाधव,मोणापा य. मोरे,कांचन सावंत,प्रियांका कार्वेकर,सानिका मोरे,सूरज मोरे,बाबाजी य.मोरे,रवळू मा.मोरे राजू बुरूड,पी.एस. मोरे मोहन नाईक(मणूर) वसंत भेकणे(मणूर) तसेच बेळगुंदी,किणये,कर्ले,बिजगर्णी,हिंडलगा,गावातील प्रतिष्ठीत मंडळी उपस्थित होतेसूत्रसंचालन..मनोहर प.मोरे यांनी व आभार शिक्षक कोमल पा.गावडे नी केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.