belgaum

आधीच झाला होता केपीसीसी अध्यक्ष पदाबाबतचा निर्णय – जारकीहोळी

0
Satish jarkiholi
 belgaum

बेळगाव लाईव्ह :”केपीसीसी अध्यक्ष पद माझ्या हातून निसटले असे नाही तर त्याबाबतचा निर्णय अधिक स्पष्ट झाला होता,” असे सांगून मुख्यमंत्री होण्यासाठी प्रदेशाध्यक्ष असणे आवश्यक नाही, असे सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले आहे.

कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती (केपीसीसी) अध्यक्षपदी सतीश जारकीहोळी यांना आपली वर्णी लागेल अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आणि काँग्रेस हाय कमांडने बी. के. हरिप्रसाद यांची केपीसीसी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांसमोर स्पष्टीकरण देताना हिरमोड झालेले मंत्री जारकिहोळी बोलत होते.

केपीसीसी अध्यक्षपद माझ्या हातून निसटले असे नाही तर त्याबाबतचा निर्णय आधीच झाला होता. पक्षाच्या ‘एक व्यक्ती, एक पद’ या निकषानुसार सर्वांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे केपीसीसी अध्यक्षपद मला मिळाले नाही असे म्हणणे योग्य नाही. याबाबत दोन महिन्यापूर्वी स्पष्ट संकेत देण्यात आले होते, असे जारकीहोळी पुढे म्हणाले.

 belgaum

आमच्या पक्षात ‘एक व्यक्ती, एक पद’ हीच भूमिका कायम राहिली आहे. शेवटच्या टप्प्यात माझे मंत्रीपद निश्चित झाले आणि केपीसीसी अध्यक्षपदाची चर्चा थांबली. त्यामुळे आम्ही या विषयावर शांत राहिलो असे सांगून उदाहरण देताना सिद्धरामय्या हे केपीसीसी अध्यक्ष नसतानाही मुख्यमंत्री झाले होते.

मुख्यमंत्री होण्यासाठी प्रदेशाध्यक्ष पद असणे आवश्यक नाही, असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री होण्यासाठी प्रदेशाध्यक्ष असणे आवश्यक नाही असे उदाहरणांसह सांगण्याचा त्यांचा हेतू मात्र पत्रकारांसाठी न उमगणारा होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.