belgaum

मराठी शाळेत कन्नड शाळा सुरू करण्यास विरोध; शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देणार

0
 belgaum


बेळगाव लाईव्ह : सावगाव येथील सरकारी हायर प्रायमरी मराठी मुला-मुलींच्या शाळेच्या परिसरात कन्नड शाळा भरविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर गावातील मराठी बांधव, आजी-माजी विद्यार्थी, पालक आणि विद्यार्थ्यांनी यास विरोध दर्शविला आहे.


स्थानिकांच्या मते, मराठी शाळेच्या इमारतीत कन्नड शाळा सुरू करण्याऐवजी त्या शाळेसाठी अन्यत्र स्वतंत्र जागेची व्यवस्था करावी. या मागणीसाठी गावातील नागरिकांनी एकत्र येत शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.


यासाठी गुरुवारी सकाळी १० वाजता सावगाव येथून सर्व मराठी बांधव, आजी-माजी विद्यार्थी, पालक व विद्यार्थी एकत्रितपणे बेळगावकडे रवाना होणार असून, सकाळी १०.३० वाजता शालेय शिक्षण अधिकाऱ्यांच्या (बीइओ आणि डी डी पी आय) कार्यालयात निवेदन सादर करण्यात येणार आहे.
या आंदोलनात गावातील सर्व मराठीप्रेमींनी सहभागी होऊन आपल्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 belgaum

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.