Friday, April 19, 2024

/

उत्तरचे आमदार ‘याकडे’ केव्हा लक्ष देणार?

 belgaum

सदाशिवनगर शेवटचा बसस्टॉप येथील रस्त्याशेजारील जलवाहिनी फुटून दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. ही जलवाहिनी दुरुस्त करण्याबरोबरच येथील इतर नागरी समस्यांचे निवारण करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

सदाशिवनगर शेवटचा बसस्टॉप येथे गेल्या 10 वर्षापासून जलवाहिनी फुटल्याने कायम पाणी वाहून वाया जात आहे. कित्येक वेळा तक्रारी अर्ज -विनंत्या करूनही प्रशासनान त्याकडे साफ दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे शहर स्मार्ट होण्याऐवजी ग्रामीण भागा स्मार्ट होत असल्याचे बोलले जात आहे.

तक्रार केल्यानंतर महानगरपालिका तसेच संबंधित खात्याचे अधिकारी पाहणी करून जातात. मात्र त्यानंतर पुढे काहींच घडत नाही. सदाशिवनगर शेवटचा बसस्टॉपचा रस्ता हा प्रमुख रस्ता असल्याने अजवड वाहनांची सतत ये -जा असते. या भागात महानपा आयुक्तांचे निवासस्थान आहे. तसेच खासदारांचेही निवासस्थान आहे. मात्र तरीही या भागाकडे साफ दुर्लक्ष केले जात त्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.

 belgaum

येथील जवळपास सर्व रस्त्यांची खड्डे पडून दुरावस्था झाली आहे. तसेच एपीएमसी रोड सदाशिवनगर, नेहरूनगर, आझमनगर सर्कल आणि संगमेश्वरनगर येथील रस्तेही खराब झाले आहेत. यात भर म्हणून बहुतांश ठिकाणचे पथदिप बंद आहेत. त्यामुळे संबंधित रस्ते अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत.Water leakage

सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथील नाल्याचा विकास झालेला नाही. गटरची सीडी कोसळण्याच्या स्थितीत आहे. संबंधित अधिकारी वारंवार तक्रार करून देखील जलवाहिनी गळती व अन्य समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

तेंव्हा बेळगाव उत्तरच्या आमदारांनी गांभीर्याने दखल घेऊन त्वरेने जलवाहिनीच्या दुरुस्ती बरोबरच अन्य समस्यांचे निवारण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत अशी जोरदार मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.