Thursday, March 28, 2024

/

बेळगाव काळ्या दिनाच्या निमित्तान शिवसेना ठाकरे गटाची क्रांतीची मशाल रॅली*

 belgaum

*31 ऑक्टोबर ला कोल्हापूर ते बेळगाव अशी निघणार क्रांतीची मशाल रॅली निघणार आहे. एक नोव्हेंबर 1956 साली केंद्र सरकारने मुंबई प्रांतात असणारे बेळगाव  कारवार निपाणी  हा बहुल मराठी प्रांत कर्नाटकात समाविष्ट करण्यात आला.

यामुळे 1956 सालापासून सीमाभागात  एक नोव्हेंबर हा दिवस बेळगाव येथे काळातील म्हणून पाळला जातो आणि याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून शिवसेना ठाकरे गटाकडून क्रांतीची मशाल मिरवणूक निघणार आहे.

ही मिरवणूक 31 ऑक्टोबर ला कोल्हापूर ते बेळगाव निघणार असून कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळापासून मशाल मिरवणुकीला सुरुवात होणार असल्याचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी म्हंटले आहे.Vijay devne

 belgaum

ही मिरवणूक कागल मार्गे कोगनोळी निपाणी संकेश्वर हत्तर्गी मार्गे बेळगावला एक नोव्हेंबर रोजी पोहोचणार आहे यावेळी या मिरवणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेतेही सहभागी होणार असल्याचे देवणे यांनी सांगितले आहे.

दरम्यान देवणे यांनी मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी यांना पत्र पाठवले असून कोल्हापूर ते बेळगांव मशाल रॅली काढण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.