Tuesday, April 23, 2024

/

मारुती गल्लीतील स्टेशनरी दुकानाला आग

 belgaum

शॉर्ट सर्किट मुळे मारुती गल्लीतील सत्कार हॉटेल बाजूच्या कॉम्प्लेक्स मध्ये बेस मेंट मध्ये असलेल्या ब्लॅक ब्युटी नावाच्या स्टेशनरी दुकानाला आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.

सोमवारी रात्री 9:15 च्या सुमारास ही घटना घडली असून आग लागल्या नंतर गल्लीत एकच गोंधळ उडाला होता.

आग लागताच तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले आहे तीन अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.Fire

 belgaum

आगीची घटना घडताच या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे.

ऐन नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी शहरातील मध्यवर्ती भागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने मंदिरात भाविकांना जनतेला याचा त्रास सहन करावा लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.