Friday, March 29, 2024

/

जशास तसे उत्तर देण्याची क्षमता केवळ मराठा जवानांत-लष्करप्रमुख मनोज पांडे

 belgaum

सीमेवर काम करताना आमचे जवान शत्रूच्या भाषेतच शत्रूला उत्तर देत आले आहेत बेळगावातील मराठा सेंटर मध्ये त्या तोडीचे जवान तयार होत असतात जशास तसे उत्तर देण्याची क्षमता केवळ मराठा रेजिमेंट मध्ये प्रशिक्षित जवानांत आहे त्यामुळे हर काम देश के नाम या तत्वावर जवानांनी कार्य करावे असे मत लष्कर प्रमुख मनोज पांडे यांनी व्यक्त केले.

बेळगावात मराठा रेजिमेंट मध्ये 17 व्या युधोत्तर पुनर्रमिलन सोहळ्याच्या सांगता समारंभात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते शनिवार 15 ऑक्टोंबर ते सोमवार 17 ऑक्टोबर पर्यंत बेळगाव येथील मराठा सेंटर मध्ये आजी माजी सैनिकांच्या मेळाव्या निमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लष्कर प्रमुख मनोज पांडे यांनी सांगता समारंभात सहभागी होताना आजी माजी जवानांशी संवाद साधला अनेक वीर नारींचा सत्कार केला.

शनिवारी या कार्यक्रमांची सुरुवात झाली होती लेफ्टनंट जनरल अजय सिंह यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली होती यावेळी भारतीय वायुदल भारतीय नौसेना आणि भारतीय तटरक्षक दलाच्या तुकड्याने देखील पथसंंचालनात सहभाग घेतला होता.Manoj pandey

 belgaum

कोरोनामुळे चार वर्षानंतर बेळगावातील मराठा सेंटरमध्ये सतरावा आजी माजी सैनिकांचा गेट टूगेदर रंगला होता यावेळी जेष्ठ आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने देशातील वेगवेगळ्या प्रांतातून सहभागी होण्यासाठी बेळगाव दाखल झाले होते. लॉकडाऊन नंतर मराठा सेंटर मधील हा पहिलाच मोठा कार्यक्रम होता यावेळी 35 वीर नारींचा सत्कार देखील करण्यात आला यावेळी कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांच्या आणि मराठी संस्कृतीची दर्शन घडवणारी प्रात्यक्षिके जवानांनी सादर केली

विशेष म्हणजे माजी राज्यपाल माजी लष्कर प्रमुख जे जे सिंह,माजी कर्नल ऑफ रेजिमेंट पी जे एस पंनू,अंदमान निकोबार कमांड मेजर जनरल के नारायणन सेवेत असलेलं आणि निवृत्त झालेले 10 लेफ्टनंट जनरल यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.