Sunday, April 28, 2024

/

भर रस्त्यावर कोसळले झाडं.. सुदैवाने ते बचावले

 belgaum

जुनाट वृक्ष अचानक रस्त्यावर कोसळल्यामुळे दोन रिक्षा आणि एका कारगाडीचे नुकसान होण्याबरोबरच एक दुचाकी स्वार थोडक्यात बचावल्याची घटना आज दुपारी 1:45 वाजण्याच्या सुमारास शहरातील ओल्ड पी बी रोड शेट्टी गल्ली कॉर्नर येथे घडली

पावसामुळे सध्या शहरात ठीक ठिकाणी झाडे कोसळण्याचे प्रकार वाढले आहेत. आज जुना पी. बी. रोड शेट्टी गल्ली कॉर्नर समोरील फॉरेस्ट कंपाऊंडच्या आतील एक जुनाट वृक्ष अचानक रस्त्यावर कोसळला. त्यामुळे वृक्षाखाली सापडून रस्त्याकडेला थांबलेल्या दोन ऑटोरिक्षा आणि एका कार गाडीचे नुकसान झाले आहे.

सदर वृक्ष कोसळत असताना प्रसंगावधान राखल्यामुळे एक दुचाकीस्वार सुदैवाने संभाव्य दुर्घटनेतून बचावला आहे. शेट्टी गल्ली कॉर्नर हा शहराचा मध्यवर्तीय भाग असून या ठिकाणी मोठी रहदारी असते.

 belgaum

अशा ठिकाणी भला मोठा वृक्ष रस्त्यावर कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होऊन मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. झाड कोसळल्याची माहिती मिळताच वनखात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याचप्रमाणे त्याने फांद्या छाटून कोसळलेला वृक्ष रस्त्यावरून हटविण्याचे काम हाती घेतले.

शहरातील धोकादायक झाडांमुळे गेल्या मंगळवारी एका युवकाला प्राण गमवावा लागला. वादळी पावसामुळे कमकुवत झाडांची पडझड सुरू असल्यामुळे अपघातांच्या घटना वाढल्या आहेत.Vehicle damage

त्यामुळे शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र वनखाते आणि महापालिकेला याबाबत कोणतेच गांभीर्य नसल्यामुळे नागरिकात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

शहरांतील मुख्य रस्त्यावरील जुनाट वृक्षांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची गरज बेळगाव live ने मांडली होती त्या नंतर वन खात्याच्या कंपाऊंड मधील जुनाट वृक्ष ओल्ड पी बी रोड वरील दिल्ली दरबार हॉटेल समोर कोसळले आहे.

*बेळगावमधील वृक्षवल्लींची वाढतेय अनाहूत भीती!*

बेळगावमधील वृक्षवल्लींची वाढतेय अनाहूत भीती!

*शहरातील झाडांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ होणे गरजेचे*

शहरातील झाडांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ होणे गरजेचे

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.