Sunday, April 28, 2024

/

दाखले मिळणारं घरपोच

 belgaum

सरकारी काम आणि बारा महिने थांब याचा अनुभव विविध सरकारी कार्यालयात गेल्यानंतर येतोच. यामुळे सरकारी कार्यालयात जाऊन कागदपत्रांची जुळवाजुळव करताना सर्वसामान्य नागरिकांना नाकी नऊ येतात. त्यातही जन्मदाखला आणि मृत्यू दाखला काढताना मोठी कसरत करावी लागते, मात्र आता ही कसरत थांबणार असून जन्म दाखला व मृत्यू दाखला घरपोच पोस्टद्वारे पाठवण्याची व्यवस्था महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे.

प्रामुख्याने जन्म दाखला व मृत्यू दाखला मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना महापालिकेत अथवा संबंधित सरकारी कार्यालयात जावे लागते.मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या रांगा आणि असणारी लांबलचक कार्यप्रणाली यामुळे सातत्याने कार्यालयात फेऱ्या घालाव्या लागतात त्यातही जन्मदाखला व मृत्यू दाखला काढण्याची काढण्यासाठी वेळेचे बंधन असल्यामुळे ठराविक वेळेतच काढणे गरजेचे असते अन्यथा कोर्टकचेरीच्या माध्यमातून दाखला मिळवण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर येते.

परिणामी यास लागणारा विलंब आणि यामुळे सातत्याने नागरिकांची होणारी ससे हेलपट थांबवण्यासाठी महापालिकेतर्फे घरपोच जन्म दाखला व मृत्यू दाखला पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

 belgaum

शिवाय सातत्याने दाखला मिळवण्यासाठी सरकार दरबारी जाण्याची वेळ व येते मात्र त्याला देखील यश न मिळाल्यास पर्याय म्हणून एजंट च्या माध्यमातून दाखले घेतले जातात. परिणामी एजंटगिरी देखील वाढत आहे या सर्व प्रकाराला चाप बसवण्यासाठी, याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. पोस्टद्वारे संबंधित अर्जदारांना दाखले घरपोच पोचवण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.