Friday, March 29, 2024

/

‘भगव्या’साठी चांदीची काठी!

 belgaum

तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम जागृतीसाठी शिवप्रतिष्ठानच्या वतीने दरवषी साजरी होणारी दुर्गामाता दौड लाखो शिवसैनिकांचे आकर्षण आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर सुरु होणाऱ्या दुर्गामाता दौडसाठी संपूर्ण शहर सज्ज झाले असून दुर्गामाता दौडीचा मानबिंदू असणाऱ्या परमपावित्र भगव्या ध्वजासाठी चांदीच्या काठीची व्यवस्था करण्यात आली आहे.

भगव्या ध्वजाच्या काठीसाठी सेंट्रल हायस्कूलच्या १९८८ सालच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने निधी उभारण्यात आला आहे. २५१ ग्रॅम चांदीच्या काठीवर सोन्याचा मुलामा देण्यासाठी निधी उभारण्यात आला असून सदर चांदीच्या काठीवर साडेतीन शक्तिपीठाच्या प्रतिमा साकारण्यात आल्या आहेत.

सदर निधीसाठी विनोद हंगिरकर, गिरीश धामणेकर, संजय हिशोबकर , प्रफुल्ल शिरवलकर, विकास मांडेकर, चंद्रशेखर पाटणेकर, लक्ष्मीकांत हावळ अनंत चौगुले, आदिनाथ सालगुडे, सचिन उसूलकर, शशिकांत उंदरे, गजानन, अनिल गुंडूचे , बांदेकर ,हभप राजू कावळे महाराज यांची आर्थिक मदत मिळाली आहे.

 belgaum

या चांदीच्या काठीला साडेतीन शक्तीपीठाच्या देवीच्या मंदिरात श्री चरण स्पर्श करुन आणण्याचा संकल्प ठेवून प्रथम शक्तीपीठ श्री करवीर महालक्ष्मीच्या मंदिरात विधीपूर्वक पूजा करण्यात आली असून महालक्ष्मी मंदिराचे पुजारी पंकज गुरुजी यांनी चांदीच्या काठीवरील प्रतिमांचे पूजन केले.Silver stick

गुरुजींच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन प्रेरणा मंत्र म्हणून श्री देवीस प्रदक्षिणा घालून ध्येय मंत्र म्हणून ध्वज उतरविण्यात आले. शनिवारी सकाळी कोल्हापूर येथे जाऊन हा सोहळा संपन्न झाला. यावेळी मंदिर सदस्य कुणाल सावंत यांनी विशेष सहाय्य केले. यावेळी विकास मांडेकर, विनोद हंगिरकर, प्रफुल्ल शिरवलकर, गिरीश धामणेकर निशांत मांडेकर आदी शिवभक्तांनी कोल्हापूर येथे जाऊन सोपस्कार पूर्ण केला.

बेळगावमध्ये हजारोंच्या संख्येत पार पडणारी हि दुर्गामाता दौड यंदाच्या चांदीच्या ध्वजकाठीमुळे आणखीनच आकर्षित करणारी ठरणार हे नक्की!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.