Tuesday, April 23, 2024

/

पिकांच्या सर्वेक्षणात शेतकऱ्यांचे हित जपा -कारजोळ

 belgaum

पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करताना शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कार्यवाही करावी तसेच संयुक्त पाहणीनंतर देखील काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले असून त्याचा समावेश करावा अशी सूचना जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकाऱ्यांना केली.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि अलीकडच्या काळात केलेल्या उपाययोजना या संदर्भातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे एकूण 400 कोटी रुपयांचे नुकसान झाले असून सध्या एनडीआरएफ मार्गदर्शक तत्त्वानुसार 105 कोटी रुपयांच्या नुकसानीचा अहवाल सादर केला जाईल.

पिकांचे नुकसान व घरांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करताना कोणत्याही कारणास्तव बोगस प्रकरणांचा समावेश होणार नाही याची काळजी घेतली जावी. सर्वेक्षण करताना ते शक्यतो शेतकरी व कुटुंबीयांच्या उपस्थितीत केले जावे असा सल्लाही पालकमंत्र्यांनी दिला.

 belgaum

बेळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे घरे, पिकं आणि पायाभूत सुविधांच्या स्वरूपात सुमारे 400 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र एनडीआरएफ मार्गदर्शक सूचीनुसार प्रथम फक्त 105 कोटी रुपयांच्या नुकसानीचा अहवाल सादर केला जाईल. भिंत कोसळणे, वीज पडणे, झाड पडणे यामुळे जिल्ह्यात 5 जणांना जीव गमवावा लागला आहे.Govind karjol

त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई यापूर्वीच देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी यावेळी सांगितले. जुलै व ऑगस्ट महिन्यातील पिकांच्या नुकसानीचे संयुक्त सर्वेक्षण करून 17.01 कोटी रुपयांची नुकसान भरपाई तातडीने जमा करण्यात आली आहे. आता सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून ती नुकसान भरपाई देखील त्वरेने अदा केली जाईल. अतिवृष्टीमुळे 678 घरे पाण्याखाली गेल्याने शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी 10 हजार रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. चालू वर्षात घरांच्या नुकसानीचे सर्वेक्षण अत्यंत पारदर्शक पद्धतीने करण्यात आले आहे. त्या संदर्भात कोणतीही तक्रार नसल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बैठकीस शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., सहाय्यक जिल्हाधिकारी अशोक धुडगुंटी, उपविभागीय अधिकारी रवींद्र कर्लिंगनावर, शशिधर बगली, कृषी खात्याचे सहसंचालक शिवनगौडा पाटील यांच्यासह विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.