Saturday, April 20, 2024

/

पोटच्या मुलासह महिलेची नदीत आत्महत्या

 belgaum

आपल्या दोन वर्षाच्या पोटच्या मुलासह एका महिलेने नदीत उडी टाकून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रामदुर्ग (जि. बेळगाव) येथे घडली आहे.

रुद्रव्वा बसवराज बन्नुरू (वय 30) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नांव असून मुलाचे नाव शिवलिंगप्पा बन्नूरू (वय 2 वर्षे) असे आहे. रामदुर्ग येथील व्यंकटेश्वर देवस्थानाच्या शेजारील मलप्रभा नदीच्या पात्रात आपल्या मुलासह उडी टाकून रुद्रव्वाने जीवन आपले व आपल्या मुलाचे संपविले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिली.

नदीकाठावर आपले चप्पल काढून पात्रात उडी घेणाऱ्या माय लेकरांसाठी रामदुर्ग पोलीस आणि अग्निशामक दलाने शोध कार्य हाती घेतले आहे.

कौटुंबिक कलहातून ही आत्महत्येची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. रामदुर्ग पोलीस ठाण्यात सदर घटनेची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.