Friday, April 19, 2024

/

घरघुती देखाव्यातून बळीराजाच्या कार्याचे सादरीकरण

 belgaum

जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याचे सण समारंभ आजही पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात.भाताची लागण झाल्यानंतर काही दिवसात येणाऱ्या गणरायाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांना काहीसा विसावा मिळतो. यामुळे
धार्मिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करताना बाप्पाची आरास देखील व्यवसायाला मिळती जुळती असावी म्हणून जोतिबा हणंमंताचे यांनी बळीराजा आणि त्याचे कार्य हे देखाव्याचा माध्यमातून सादर केले आहे.

हलगा तानाजी गल्ली येथील शेतकरी जोतिबा हणमंताचे यांनी आपल्या गणराया समोर शेतकरी आणि शेतकऱ्याची शेतातील मशागत याचे चित्र दर्शविणारा देखावा सादर केला आहे.साधारण पंचवीस दिवसांच्या कालावधीत सादर केलेला हा देखावा संपूर्ण शेतकरी जीवन सादर करत आहे. गाडीवर बसून गाडी हाकणारा गणराया ही गणेशाची मूर्ती असून त्या भोवताली शेतकरी जीवन दर्शविण्यात आले आहे.

दररोज सकाळी शेतकरी उठल्यानंतर शेतात जाऊन वैरण काढणे गाई म्हशींना चारा घालून दूध काढणे ही कामे करत असतो.सदर कामे त्या ठिकाणी दर्शविली आहेत. तसेच विहीर ट्रॅक्टर शेतीची आवश्यक असणारी इतर साधने आणि त्याद्वारे सुरू असणारी शेतकी कामे याचे चित्र देखाव्याच्या माध्यमातून दाखविण्यात आले आहे.Farmers

तरुणाई सध्या नोकरीच्या शोधात असताना शेतकरी व्यवसाय करण्याकडे तरुणाईचा कल नसल्याचे दिसून येत आहे मात्र शेतकऱ्याचे महत्त्व किती आहे हे दर्शविण्यासाठी म्हणून हा देखावा सादर करण्यात आला आहे.

शेतकऱ्याचे कार्य आणि शेतकऱ्याची गरज हे सर्वांना समजावे तसेच जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी यावर बाप्पाची सदैव कृपा करावी अशी आशा व्यक्त करत हा आगळावेगळा ग्रामीण भागातील शेतकी जीवन दर्शविणारा देखावा सादर केला आहे. हुबेहूब ग्रामीण भागातील शेतकरी जीवनाची प्रतिकृती उभारताना आपला शेतकरी जीवनाशी असलेला संबंध याचा अवलंब करत त्यांनी हा देखावा सादर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.