Sunday, April 28, 2024

/

‘ऑपरेशन मदत’ तर्फे सेंद्रिय शेती अंतर्गत वनशेती

 belgaum

खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या गोल्याळी गावातील सरकारी शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना घेऊन ‘ऑपरेशन मदत’ ग्रुपतर्फे वनशेतीचा उपक्रम प्रारंभ करण्यात आला आहे.

हा प्रयोग ग्रामीण शिक्षण अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येत असून याद्वारे पर्यावरणीय समतोल राखला जाईल व सेंद्रिय शेतीचा विकास टप्प्याटप्प्याने करण्यात येईल, अशी माहिती राहुल पाटील यांनी दिली.

प्रसार माध्यमांशी बोलताना राहुल पाटील यांनी सांगितले की, छोट्या शाळकरी मुलांमध्ये शेतीची आवड निर्माण व्हावी व पर्यावरणात होणारा बदल कळावा, पर्यायाने निसर्गातील सजीव वस्तूवर होणारे दुष्परिणाम याबद्दल शिक्षीका आरती चौगुले यांच्यामार्फत माहिती देण्यात येत आहे.Organic farm

 belgaum

गोल्याळीच्या या मुला-मुलींनी आतापर्यंत परसदारी भाजीपाला लागवड, शाळेच्या आवारात भाजीपाला उगवून त्याचा माध्यांन आहारात वापर, फळ व फुलझाडे लागवड असे अनेक प्रयोग ग्रामीण शिक्षण अभियानाच्या माध्यमातून केले आहेत.

त्याबद्दल वेळोवेळी सर्वांना कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याच पद्धतीने सेंद्रिय शेतीचे प्रयोग चिगुळे, आमटे, कणकुंबी, तळावडे तसेच खानापूर व चंदगड मधील धनगर वाड्यावर चालू आहेत, असेही राहुल पाटील यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.