Saturday, April 20, 2024

/

तडिपारच्या त्या आदेशाला न्यायालयाची स्थगिती

 belgaum

अनगोळ येथील युवकावर मटका आणि जुगार प्रकरणी कठोर कारवाई करत वर्षभरासाठी तडीपारची कारवाई करणार्‍या पोलिस प्रशासनाला दणका बसला आहे. या कारवाईविरोधात तरूणाला 48 तासांच्या आत स्थगिती आदेश मिळाला आहे.

मटकाप्रकरणी सातत्याने कारवाई करूनही अनगोळ येथील तरूण परशुराम बाबू मेत्री (वय 40) सुधारत नसल्याचा ठपका ठेऊन दोन दिवसांपूर्वी कायदा आणि सुव्यवस्थेचे पोलिस उपायुक्त रविंद्र गडादी यांनी 19 सप्टेंबर 2022 ते 18 सप्टेंबर 2023 पर्यंत तडीपारचा आदेश बजावला होता.

या आदेशाविरोधात परशुरामने न्यायालयात धाव घेतली होती. अ‍ॅड. श्रीधर मुतगेकर यांनी परशुरामची बाजू मांडली. त्यानुसार आठवे जिल्हा सत्र आणि दिवाणी न्यायालयाने पोलिस उपायुक्तांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

केवळ 48 तासांत पोलिसांच्या आदेशाला स्थगिती मिळाली आहे. परशुरामच्या वतीने अ‍ॅड.श्रीधर मुतकेकर आणि अ‍ॅड. आशिष कट्टी यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.