belgaum

केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी बेळगाव जिल्ह्याला 10 वा क्रमांक मिळाला आहे बेळगाव जिल्ह्याची रँकिंग टॉप 10 मध्ये आल्याने 26 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा सत्कार केला जाणार आहे.

bg

केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून बेळगाव जिल्ह्याने देशात दहावा क्रमांक पटकावला आहे याबद्दल जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे कौतुक होत आहे.

केंद्र सरकारने 12 एप्रिल 2022 पासून सुरू केलेली आझादी से अंत्योदय तक (ASAT) मोहीम 15 ऑगस्ट 2022 रोजी संपली. देशातील 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 75 जिल्ह्यानी या मोहिमेत सहभागी झाले होते. या मोहिमेत केंद्र सरकारच्या 9 निवडक विभागांचे 17 प्रकल्प प्रभावीपणे राबवून बेळगाव जिल्ह्याने नागरिकांना व लाभार्थ्यांना उत्कृष्ट सेवा देऊन 84-85% ची कामगिरी नोंदवली.

बेळगाव जिल्ह्याच्या या अनोख्या कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारने बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच.व्ही. यांना सन्मान व पुरस्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले आहे.Dc nitesh patil

26 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील लोधी रोड हॅबिटॅट सेंटर येथे सत्कार समारंभ होणार आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील व जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच.व्ही. पी डी डी पी आर नियोजन संचालक रवी बंगरेप्पनवरा यांना कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

आरोग्य, ग्रामविकास, महिला व बालविकास, कामगार विभागासह 9 विभागांच्या 17 प्रकल्पांच्या प्रगतीचा विचार करून ही श्रेणी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.