belgaum

अनगोळ घरफोडी प्रकरणातील दोघांना बेड्या

0
Tilakwadi ps
 belgaum

बेळगाव लाईव्ह : अनगोळ परिसरात घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना टिळकवाडी पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून १६ लाख ५७ हजार ३५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

बेळगावमधील अनगोळ भागात झालेल्या चोरीप्रकरणी टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने तपास करून उज्वला रवी कम्मार आणि शिवा शंकर अप्पयनवर या दोन संशयितांना ताब्यात घेतले. उज्वला ही मूळची चित्रदुर्ग जिल्ह्यातील असून सध्या ती पिरणवाडीत घरकाम करते, तर शिवा हा हिंडलगा येथील रहिवासी आहे.

पोलिसांनी या कारवाईत ७ लाख ४९ हजार रुपये किमतीची सोन्याची पाटी, दीड लाखांची अंगठी, नेकलेस, सोन्याचे गंठण आणि अन्य चार अंगठ्या असा एकूण ११०.४९ ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 belgaum

या यशस्वी मोहिमेत पोलीस निरीक्षक परशुराम पूजेरी, पीएसआय विश्वनाथ घंटा मठ, प्रभाकर डोळ्ळी आणि त्यांच्या पथकातील महेश पाटील, एस. एम. करलींगण्णवर, लाडजीसाब मुल्तानी, सतीश गिरी व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या पथकाच्या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी त्यांचे कौतुक करून बक्षीस जाहीर केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.