Sunday, July 21, 2024

/

खणगावमध्ये संगोळी रायन्ना फलकाचा अवमान

 belgaum

भाजप आणि काँग्रेसमध्ये वीर सावरकरांवरून सुरु असलेला वाद ताजा असतानाच आज गोकाक तालुक्यातील खणगाव येथे क्रांतिवीर संगोळी रायन्ना फलकाचा अवमान करण्यात आला आहे. यावरून पुन्हा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले झाले होते.

खणगाव येथे क्रांतिवीर संगोळी रायन्ना चौक असे नामकरण करून नामफलक लावण्यात आला होता. या फलकावरील क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांचे चित्र फाडून टाकण्यात आल्याने गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेनंतर टायर पेटवून निषेध मोर्चा काढण्यात आला असून गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी संगोळी रायन्ना चाहत्यांनी केली आहे.Gokak khangaon

राष्ट्र पुरुष कोणत्याही चौकटीत अडकलेले नसतात जाती पंत धर्म भाषा याच्या बाहेरचे असतात त्यांचं कार्य हे संपूर्ण समाजाला आदर्शवत असतं या परिस्थितीत जर कोणताही महापुरुषाची जर विटंबना अवमान होत असेल तर संपूर्ण समाजाने त्याचा निषेध करणे गरजेचे आहे.

कारण राष्ट्रपुरुषांनी आपल्यासाठी आपल्या भवितव्यासाठी आणि एकंदर समाजासाठी खूप मोठं कार्य केलेलं असतं आणि ते कार्य ठराविक चौकटीत मर्यादित नसतं त्यामुळे एकंदर अशा घटनांना पायबंद घातला पाहिजे आणि समाजातूनच एकमुखी त्याला विरोध केला गेला पाहिजे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.