belgaum

रोट्रॅक्ट क्लब ऑफ केएलइ (व्हीके इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स) चा तिसरा अधिकारग्रहण समारंभ नुकताच पार पडला.

प्रोस्थेटिक गॅली हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या अधिकारग्रहण समारंभास रोटेरियन राज बेळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. इन्स्टॉलेशन अधिकारी म्हणून राज बेळगावकर यांनी अधिकारपदाची सूत्रे प्रदान केली.

मावळते सचिव रोझेल वास यांनी वार्षिक अहवाल सादर केला. सिम्रनजीत कौर देओल यांची अध्यक्षपदी तर निहारिका समगा यांची सचिवपदी निवड करण्यात आली. तर खजिनदार पदी सावेंद्र फुर्तादो आदींसह इतर अन्य पदाधिकाऱ्यांना अधिकारपदाची शपथ देऊन अधिकारपदाची सूत्रे सुपूर्द करण्यात आली.Rotract vkids

यावेळी मावळते अध्यक्ष जयंत एच यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. राज बेळगावकर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीसंदर्भात मार्गदर्शन केले.

या समारंभास बसवराज विभूती, डॉ. महांतेश पाटील, अक्षय कुलकर्णी, डॉ. मनीषा हेरेकर, अनिकेत जाधव, निखिल चिंडक, डॉ. के एम केळुस्कर आणि इतर रोटेरियन उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.