belgaum

बहिण भावाच्या अतुट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन.आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारा भाऊ बहिणींना मिळणे हे बहिणींचे भाग्य. असाच आपल्या पाठीशी सदैव उभे असणाऱ्या भावाला त्या बहिणींनी राखी बांधली आणि गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता निर्माण झालेले हे बहिण भावाचं नातं यामुळे अधिकच घट्ट बनले.

अनगोळ येथील माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांना मनपा स्वच्छता कर्मचारी यांनी राखी बांधली. सकाळी स्वच्छतेनंत्तर न विसरता यावर्षी सलग पाचव्या वर्षी त्या स्वच्छ्ता कर्मचाऱ्यांनी त्यांना राखी Gunjatkar

बांधली.विमल,सुजाता,दुर्गा,मालू शकुंतला, गंगु, गिरीजा, जयश्री, भीमव्वा,रंजना, सुधा, सलोमी या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी राखी बांधली.

बहिणी आपल्या घरी रक्षाबंधनासाठी येणार म्हटल्यानंतर भावाची आणि घरातील कुटुंबीयांचे ज्या पद्धतीने लगबग चालू असते त्याच पद्धतीने रक्षाबंधन कार्यक्रम आटोपताच सर्व कर्मचाऱ्यांना चहा नाष्टा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

सपत्नीक विनायक गुंजटकर यांची आरती करून स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आपल्या भावाला राखी बांधली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.