Tuesday, June 25, 2024

/

आता शोध मोहिमेसाठी… ड्रोन कॅमेरा

 belgaum

रेस कोर्स मैदानातील झाडीत शिरलेल्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभाग कार्यरत असून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे तसेच त्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहे.

मात्र अजूनही बिबट्याला पकडण्यात यश आले नसून वनविभागाकडून बिबट्याची शोध मोहीम सुरूच आहे. मोहिमेसाठी ड्रोन कॅमेरे लावण्यात आले आहेत.

बिबट्याची दहशत नागरिकांच्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार करत वनविभागाकडून बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे लावण्यात आले आहेत.बिबट्याची छबी तत्पूर्वी कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे हनुमान नगर,जाधव नगर,क्लब रोड परिसरातील नागरिकांना सतरतेचे आवाहन करण्यात आले आहे मात्र नागरिकांच्या दृष्टिकोनातून आता विचार करता बिबट्याला पकडन्यासाठी शर्तीचे प्रयत्न म्हणून ड्रोन कॅमेरा लावण्यात आला आहे. Drone cam forest

 belgaum

वन खात्याने आठवड्याभरापासून बिबट्याची शोध मोहीम सुरू ठेवली आहे मात्र अजूनही बिबट्या अडकला नसल्याने अखेर बिबट्याला शोधण्यासाठी जंगल परिसरात ड्रोन कॅमेरा चा वापर सुरू केला आहे.

गुरुवारी दुपारी खात्याने ड्रोन कॅमेराने शोध केला आहे. एसीएफ श्रीमल्लिनाथ कुसनाळ यांच्या नेतृत्वाखाली 50 जणांची टीम शोध कार्यात सहभागी झाली असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.