belgaum

महाराष्ट्रातील पुणे येथील ‘बेलगामाईट्स इन पुणे’ या ग्रुपतर्फे पुण्यामध्ये आयोजित भेटीचा मेळावा नुकताच उत्तम प्रतिसादासह मोठ्या उत्साहात पार पडला.

bg

सदर मेळाव्यास सर्व वयोगटातील जवळपास 100 सदस्यांनी हजेरी लावली होती. मेळाव्याचा शुभारंभ मंदार कोल्हापुरे आणि स्वाती पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाला. अमृता मगदूम हिने सर्वांचे स्वागत केल्यानंतर कस्तुरी जगताप व अमर कुलकर्णी यांनी मजेदार खेळाच्या माध्यमातून सर्वांचा सुलभ परिचय करून दिला.

संयोजक कार्यकर्ते वैभव कुलकर्णी आणि सचिन पाटील यांनी पुण्यात बेळगावच्या रहिवाशांचा ग्रुप स्थापण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. तसेच या समुदायाचा हेतू आणि पुढील महिन्यातील संभाव्य कार्यक्रम तसेच उपक्रमांची माहिती दिली.Pune

तज्ञ बेकर पौरवी कुलकर्णी यांनी तयार केलेला केक कापण्यात आल्यानंतर नीता अमनजी आणि त्रिजा रॉड्रिग्ज यांनी सर्वांचे आभार मानले. मेळाव्याची सांगता शौनक कलघटगी, डॅनियल रारावी आणि अमर यांच्या वाद्यवृंदाच्या उत्साही धमाकेदार संगीत कार्यक्रमाने झाली.

विनायक लाड याचे उत्तम सूत्रसंचालन लाभलेल्या या कार्यक्रमाच्या सत्रात उपस्थित अनेकांनी आपली गायन प्रतिभा प्रकट केली. अखेर कार्यक्रम स्थळी दुपारच्या भोजनाने भेटीच्या मेळावा समाप्त झाला.

yash

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.