कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून गणेशोत्सव सोहळ्यावर अनेक निर्बंध आले होते. मात्र यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी करावी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडप परवानगीसाठी शहरात एक खिडकी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तर्फे साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवासाठी प्रामुख्याने विविध विभागाचे परवाने घेणे आवश्यक असते. सदर परवाने घेत असताना गणेशोत्सव मंडळांची खूप तारांबळ उडते.
मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची सोय एकाच छताखाली व्हावी या उद्देशाने एक खिडकी सुविधा सुरू करण्यात आली आहे यामुळे एकाच छताखाली मंडळांना परवाने उपलब्ध होणार आहेत.
बेळगावचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या या गणेशोत्सवासाठी विविध मंडळांकडून देखावे साजरे केले जातात.
यासाठी वीज कनेक्शन तसेच महसूल सार्वजनिक बांधकाम विभाग,ऊर्जा ,अग्निशामक दल पोलीस खाते तसेच शहरी स्थानिक स्वराज्य संस्था कडून परवानगी घ्यावी लागते. वेळी सदर परवानगी देण्याकरता सिंगल विंडो अर्थात एक खिडकी व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.
सिंगल विंडोशी संबंधित अधिकाऱ्यांचे नाव आणि मोबाईल नंबर pic.twitter.com/no1Th11BeA
— Belgaumlive (@belgaumlive) August 24, 2022