Thursday, May 2, 2024

/

‘त्या’ शिक्षकाला फाशीची शिक्षा द्या यांनी केली मागणी

 belgaum

राजस्थान येथे 3 री मध्ये शिकणाऱ्या दलित विद्यार्थ्याला पाणी पिण्यावरून एका शिक्षकाने जबर मारहाण केली होता. त्यामुळे तो विद्यार्थी जखमी झाला होता.

Dalit protestत्या जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला त्यामुळे संपूर्ण देशभर त्या शिक्षकाच्या विरोधात तसेच एका महिला शिक्षिकेला जाळण्यात आली आहे ती 80% भाजली असून तिच्यावर उपचार सुरू आहे महिला आणि मुलांवर होणाऱ्या अन्याय विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

त्या निमित्त शनिवारी आंबेडकर फांथर्स आणि दलित संघर्ष समिती आंबेडकर वाद संघटनेच्या वतीने लहान शाळकरी विद्यार्थ्यांनवर होत असलेल्या अन्याय विरोधात तीव्र आक्रोश करत आंबेडकर उद्यान ते चन्नमा चौकापर्यंत कॅण्डल रॅली कडून चन्नमा चौकात श्रद्धांजली वाहिन्यात आली.

 belgaum

त्या घटनेचा तीव्र निषेध करून त्या लहान मुलाला तो शिक्षक समजावून सांगितला असता तर चांगले झाले असते पण त्या शिक्षकाने शिक्षकाच्या वृत्तीला काळिमा फासण्याचे काम केला आहे त्या शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

यावेळी आंबेडकर पँथर्सचे श्रीनिवास तळवार, मानतेश तलवार, राजू तळवार ,राजेश कांबळे ,दुर्गांना कांबळे, दत्ता कांबळे ,कुमार देवरमणी, राजश्री कांबळे, अनिता कांबळे, रफिक मिरचीवाले सहित विविध संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.