Saturday, July 27, 2024

/

पूर्व भागात शेतकऱ्याच्या नजरेस बिबट्या सदृश्य प्राणी?

 belgaum

शेतात काम करत असतेवेळी बसवन कुडची येथील शेतकऱ्याला बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याने या भागात देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर शेतकऱ्याचे नाव तानाजी मुतगेकर असून त्याने त्या बिबटया सदृश्य प्राण्याला पाहताच घाबरून गावाकडे पलायन करून ग्रामस्थांना या गोष्टीची कल्पना देण्यात आली. त्या प्राण्याला पाहिलेले शेतकरी तानाजी मुतगेकर घाबरलेल्या मनस्थितीत आहेत.

शेतकऱ्यांनी नगरसेवक बसवराज मोदगेकर यांची भेट घेवून याची माहिती दिली. त्यानंतर वन खाते आणि उत्तरचे आमदार अनिल बेनके यांना यांची माहीती देण्यात आली.

घटनेनेनंतर कुडची मध्ये ग्रामस्थ एकत्रित येऊन चर्चा करत होते. शनिवारी दुपारी वन खात्याचे अधिकारी बसवन कुडची परिसरात दाखल झाले असून शेतकऱ्याला दिसलेल्या बिबट्या सदृश्य प्राण्याच्या पाऊल खुनांचा शोध घेतला जात आहे. तो प्राणी बिबट्या आहे कि तरस की आणखी कोणता याचा तपास सुरु आहे.

Farmers
बसवन कुडची येथील तानाजी मुतगेकर या शेतकऱ्याने बिबट्या सदृश्य प्राण्याला पाहिल्यानंतर नगरसेवक बसवराज मोगवेकर यांची भेट घेऊन त्यांना या घटनेची कल्पना दिली

गेले पंधरा दिवस गोल्फ कोर्स जंगलात वास्तव्यास असलेला बिबट्या आता कुडची-निलजी परिसरात दाखल झाला आहे का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून कुडची आणि निलजी बेळ्ळारी नाला परिसरात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगून, शेती काम करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

दोन्ही गावात दवंडी देखील देण्यात आली आहे. जर कुडची भागात आता बिबट्याचा वावर असेल तर शहराच्या पूर्व भागात देखील आला आहे का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर कुडची परिसरात आढळल्याने या भागातील सर्व शालेय विध्यार्थ्यांना खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली असून शेताकडे न जाण्याचे बजावण्यात आले आहे. प्रत्येक शाळातील शिक्षकांनी या सूचना विध्यार्थ्यांना दिल्या आहेत.

दरम्यान वन खात्याने शेतकऱ्याला तरस आणि बिबट्या दोन्ही फोटो दाखवले असता शेतकऱ्यांने तो प्राणी बिबट्या नसून तरस असल्याचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.